‘जाँबाज हिंदुस्थानी सेवा समिती’च्या वतीने तमिळनाडू येथील ‘हिंदू मक्कल कत्छी’चे (‘हिंदु जनतेची आघाडी’चे) संस्थापक सदस्य श्री. अर्जुन संपथ, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल आणि गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील ‘सत्यमेव जयते’ संघटनेचे संस्थापक श्री. सत्यमेव जयते लोकमंगल आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा धर्मकार्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी गौरव करण्यात आला. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या व्यासपिठावर ‘जाँबाज हिंदुस्थानी सेवा समिती’चे अध्यक्ष श्री. आलोक आझाद, उपाध्यक्ष श्री. आलोक तिवारी, महामंत्री श्री. प्रवीण उपाध्याय आणि कोषाध्यक्ष श्री. धीरेंद्र श्रीवास्तव यांनी या धर्मविरांना सन्मानचिन्ह प्रदान केले.