पाकिस्तानी जनतेने अधिक प्रमाणात चहा पिऊ नये ! – मंत्री अहसान इक्बाल

आर्थिक डबघाईच्या उंबरठ्यावर जिहादी पाकिस्तान !

पाकचे मंत्री अहसान इक्बाल

इस्लामाबाद – आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने तो डबघाईला जात असल्याचे सूचक विधान केले आहे. पाकिस्तानी जनतेने अधिक प्रमाणात चहा पिऊ नये, असे पाकचे मंत्री अहसान इक्बाल यांनी म्हटले आहे. चहासाठी लागणारे साहित्य पाकला कर्ज घेऊन आयात करावे लागते. त्यामुळे जर जनतेने हे पाऊल उचलले, तर आयातीवरील खर्च न्यून होण्यास साहाय्य होईल, असे अहसान म्हणाले.

पाकमध्ये वीजेचे संकट असल्याने बाजारात रात्री साडेआठ नंतर वीज बंद केली जाते. पाक सरकारने गेल्या मासात आयात खर्च न्यून करण्यासाठी ४१ वस्तूंवर २ मासांसाठी बंदी आणली आहे. या निर्णयामुळे आयातीवरील खर्चात ६० कोटी डॉलर्सची घट झाली असली, तरी हे एकूण आयात खर्चाच्या केवळ ५ टक्के इतकेच आहे, असेही इक्बाल म्हणाले.