सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी सांगितलेला सुख-दुःखाच्या प्रसंगांकडे बघण्याचा मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद !

‘जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग आल्यावर मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद कसा असतो ?’, याविषयी जिल्ह्यांमध्ये चालू असलेल्या भावसत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. मनुष्य

जेव्हा मनुष्याच्या जीवनात सुख येते, तेव्हा तो त्याचे कर्तेपण स्वतःकडे घेतो. जेव्हा त्याच्या जीवनात दुःख येते, तेव्हा त्याविषयी तो भगवंताला दोष देतो. तो म्हणतो, ‘भगवंताने असे का केले ?’

२. साधक

कु. मनीषा माहुर

जेव्हा साधकाच्या जीवनात सुखाचे क्षण येतात, तेव्हा तो ‘सर्वकाही ईश्वरी कृपेने किंवा गुरुकृपेनेच झाले’, असे म्हणतो. जीवनात दुःखाचे प्रसंग आल्यावर ‘हे माझ्या प्रारब्धामुळे झाले’, असे साधकाला वाटते. साधक सुख-दुःख यांवर मात करण्याचे प्रयत्न करत असल्यामुळे ते कठीण प्रसंगात निराश न होता त्यातून बाहेर येतात.

३. शिष्य

‘जीवनात येणारे सुख-दुःख म्हणजे गुरुकृपा आहे’, असे शिष्याला वाटते. ‘जेव्हा जीवनात सुख असेल, तेव्हा आपले पुण्य संपत आहे आणि विपरीत घडत असेल, तर पाप नष्ट होत आहे’, असे शिष्याला वाटते. तो सुख-दुःखाच्या पलीकडे, म्हणजे आनंदावस्थेकडे जातो.

निराशा आणि दुःख याऐवजी ‘पाप नष्ट होत आहे’, या विचाराने शिष्यांना कृतज्ञता वाटते.

सद्गुरु पिंगळेकाकांनी वरीलप्रमाणे दिलेल्या दृष्टीकोनामुळे ‘शिष्य बनण्यासाठी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?’, याविषयी साधकांना शिकायला मिळाले.

– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र, देहली. (२३.९.२०२१)