प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील दंगलखोर मुसलमानाच्या घरावर कारवाई करतांना १० सहस्र पोलीस तैनात !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – नूपुर शर्मा यांच्या विरोधात शुक्रवार, १० जून या दिवशी नमाजानंतर मुसलमानांनी हिंसाचार केला होता. या प्रकरणी पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असणार्‍या जावेद याचे अवैध घर १२ जून या दिवशी प्रशासनाकडून पाडण्यात आले. या वेळी एक किलोमीटर परिसरात १० सहस्र पोलीस तैनात करण्यात आले होते.

प्रयागराजच्या अटाला मशिदीचा इमाम अली अहमद याला अटक

प्रयागराज येथे मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी येथील अटाला मशिदीचा इमाम अली अहमद याला अटक केली. अली अहमद यानेच पोलिसांना ‘काफीर’ संबोधत मुसलमानांना चिथावले होते. त्यानंतर मुसलमानांनी येथे दगडफेक आणि जाळपोळ केली. (सरकारने या हिंसाचारात झालेली हानी अशांकडून वसूल करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • एका दंगलखोर मुसलमानाच्या अवैध घरावर कारवाई करण्यासाठी १० सहस्र पोलीस लागत असतील, तर उद्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी धर्मांधांनी उठाव केला, तर हिंदूंचे रक्षण करण्यास पोलीस पुरे पडतील का ?
  • धर्मांधांची इतकी दहशत असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !