इस्लामी देशांकडून भारताला विरोध होण्यामागे ओमानच्या प्रमुख धर्मगुरुंचा हात !

ओमान देशाचे प्रमुख धर्मगुरु मुफ्ती शेख अहमद बिन हमाद अल् खलीली

नवी देहली – नूपुर शर्मा प्रकरणी इस्लामी देशांमध्ये भारतीय साहित्यांवर बहिष्कार घालण्याची मोहीम चालू झाली आहे. यामागे ओमान देशाचे प्रमुख धर्मगुरु मुफ्ती शेख अहमद बिन हमाद अल् खलीली (वय ७९ वर्ष) यांचा हात आहे. त्यांनी भाजपच्या विरोधात ट्वीट करून मोहीम चालू केली. खलीली हे पाकिस्तानचे समर्थक आहे. त्यांना पाकिस्तानने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ दिला आहे. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा विजय झाल्यावर तालिबानचे अभिनंदनही केले होते. यासै ओमानमध्ये मद्यबंदी करण्याची मागणीही त्यांनी त्यांच्या सरकारकडे केली आहे.

खलीली यांनी नूपुर शर्मा प्रकरणी म्हटले, ‘हे एक असे प्रकरण आहे ज्याविरोधात इस्लामी देशांनी आवाज उठवला पाहिजे.’ त्यांच्या या आवाहनानंतरच इस्लामी देशांकडून भारताला विरोध चालू झाला आणि नंतर भाजपने नूपुर शर्मा यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले.

संपादकीय भूमिका

इस्लामी देश त्यांच्या प्रमुख धर्मगुरूंचे ऐकतात आणि त्याप्रमाणे कृती करतात, तर भारतातील हिंदू शासनकर्ते नास्तिकतावादी, पुरो(अधो)गामी, डावे, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदींचे ऐकून हिंदूंच्या संतांना आणि शंकराचार्यांना खोट्यानाट्या आरोपांच्या आधारे कारागृहात टाकतात !