तेहरान (इराण) – इराणमध्ये विवाहामध्ये विश्वासघात केल्याच्या प्रकरणी ५१ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. या सर्वांना शरीयत कायद्यानुसार भरचौकात बांधून त्यांना दगड मारून ठार करण्यात येणार आहे. यात २३ महिला आणि २८ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्वजण २० ते ३० वयोगटांतील आहे.
ईरान में 51 लोगों को खौफनाक मौत देने का आदेश, फांसी की सबसे ज्यादा सजा सुनाने वाला देश हैं ईरान #Iran #WorldNews https://t.co/p5j8U3MfdK
— DNA Hindi (@DnaHindi) May 30, 2022
अशी दिली जाणार शिक्षा !
या सर्वांना पांढरे कपडे घालायला देण्यात येतील. नंतर त्यांना कमरेपर्यंत एका खड्ड्यात गाडले जाईल आणि त्यानंतर त्यांना ते मरेपर्यंत दगड मारण्यात येतील.
संपादकीय भूमिकाभारतात ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु तरुणींचा विश्वासघात करणार्यांनाही शरीयत कायद्यानुसार अशी शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |