शरणागत मी तव चरणी ।

मी रुग्णाईत असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आता भावावस्थेत, गुरुस्मरण आणि नामजप करत रहायचे. चिंता करू नका. देवच (गुरुदेवच) तुम्हाला भोग भोगायला शक्ती देईल.’’ त्यांच्या या प्रीतीयुक्त आशीर्वचनाने माझे मन भरून आले. मी गुरुदेवांना प्रार्थना करू लागले, ‘भगवंता, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न माझ्याकडून करवून घे. ईश्वरा, मला तुझ्या अनुसंधानात, भावावस्थेत, नामजपात ठेव. मला तुझ्या चरणी विलीन करून घे.’त्यानंतर मला पुढील ओळी सुचल्या. 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीरंगा, भावभक्तीची गंगा । वाहू दे मनात रे ।। १ ।।

कृपानिधे, मनात माझ्या रुजू दे । देवा, नाम तुझे ।। २ ।।

सौ. शालिनी मराठे

सुकुमार असे तव चरण ।
आनंदे अन् नित्य होऊ दे, त्यांचे स्मरण ।। ३ ।।

जगत्पती तू असता दाता ।
असता साह्य तुझे, करू कशाला मी चिंता ।। ४ ।।

करुणाकर तू परम पिता ।
कुणी न या जगत्रयी तुजविण त्राता ।। ५ ।।

अहंभावे केले जे कुकर्म ।
उभे ठाकले तेच प्रारब्ध होऊनी ।। ६ ।।

तुझ्याविना माझे नाही कुणी ।
आता शक्ती दे, ते सोसण्या माय-बापा ।। ७ ।।

श्रीकृष्णा, घननिळा, निवारी बा प्रारब्धाच्या झळा ।
घेई बा तव चरणी ।। ८ ।।

शरणागत मी तव चरणी । योग्य तेच तू करूनी घे ।। ९ ।।

– गुरुचरणी शरणागत,

सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक