आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना संपत्तीतून वगळण्याचा हरिद्वार न्यायालयाचा निर्णय  

प्रातिनिधिक छायाचित्र

हरिद्वार (उत्तराखंड) – आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना संपत्तीतून वगळण्याचा निर्णय येथील न्यायालयाने दिला. ६ वृद्ध दांपत्यांनी त्यांचा छळ करणार्‍या मुलांच्या विरोधात आणि त्यांना दिलेली संपत्ती परत घेण्यासाठी याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने या मुलांना पुढील महिनाभरात संपत्ती परत करण्याचाही आदेश दिला आहे. जर या आदेशाचे पालन केले नाही, तर पोलिसांना संपत्ती कह्यात घेऊन ती वृद्धांना परत करण्यासाठी कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

मुलांवर योग्य संस्कार न केल्याने अशी मुले पुढे आई-वडिलांचाच छळ करतात. हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवून धर्माचरण करण्यास शिकवल्यावर ते आई-वडिलांचा श्रावणबाळाप्रमाणे वागून सांभाळ करतील !