मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घालून शिवलिंगाच्या पूजेची अनुमती द्या !

ज्ञानवापीच्या प्रकरणी हिंदूंकडून नवीन याचिका

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील दिवाणी न्यायालयात २५ मे या दिवशी विश्‍व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्रसिंह बिसेन यांच्या पत्नी किरण सिंह यांनी नव्याने एक खटला प्रविष्ट केला आहे. यामध्ये त्यांनी ज्ञानवापी परिसरात मुसलमानांच्या प्रवेशावर तातडीने बंदी घालावी, ज्ञानवापीचा संपूर्ण परिसर हिंदूंच्या कह्यात द्यावा आणि आता सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने ही याचिका जलद गती न्यायालयात वर्ग केली आणि त्यावर ३१ मे या दिवशी सुनावणी होणार आहे.