‘ज्ञानवापी मशीद मंदिर असेल, तर हिंदूंना सोपवा’ म्हणणाऱ्या समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांना पक्षाने पदावरून हटवले !

रूबीना खानम

अलीगड (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदु मंदिर असल्याचे पुरावे सापडत असतील, तर मुसलमानांनी आनंदाने मशीद हिंदूंना सोपवली पाहिजे, असे विधान करणाऱ्या येथील समाजवादी पक्षाच्या महिला विभागाच्या अलीगड शहर अध्यक्षा रूबीना खानम यांना पक्षाने पदावरून हटवले आहे.

‘कुणा दुसऱ्याच्या धार्मिक भूमीला नियंत्रणात घेऊन तेथे नमाजपठण करणे, हे ‘हराम’ (निषिद्ध) आहे, याचा विचार मुसलमान धर्मगुरूंनी करायला हवा’, असेही खानम् म्हणाल्या होत्या.

संपादकीय भूमिका 

यातून समाजवादी पक्ष ‘मुसलमानवादी पक्ष’ आहे, हेच स्पष्ट होते !