श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’

२. ‘साधना म्हणजेच आनंद ! साधनेतील आनंद अनुभवण्यासाठी त्या मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर चिकाटीने मात करतो, तो खरा साधक !’

३. ‘साधकांनो, सत्संगाच्या वेळी देवता, ऋषिमुनी आणि पुण्यात्मे यांचेही आगमन होत असल्याने सत्संगाला वेळेत उपस्थित रहा !’

४. ‘प्रत्येक सेवा ‘साक्षात् भगवंताची पूजा करत आहे’, या भावाने केल्यास ईश्वराला अपेक्षित अशी सेवेची पूर्ण फलनिष्पत्ती मिळेल !

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ