स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यामुळे इस्लामी स्थलांतरितांच्या संकटाने वेढलेला आसाम !

आसाममध्ये घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला होत असलेला धोका पहाता त्यांना तात्काळ हद्दपार करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करायला हवी !

आसाममध्ये मुसलमानी कारवाया ७४ वर्षे चालल्या आहेत, यासंबंधी त्या काळातल्या काँग्रेस नेत्यांनी पूर्ण डोळेझाक केली; म्हणून आज हा राक्षस उभा आहे. अशा अदूरदृष्टी निःस्वार्थी काँग्रेसला हिंदु समाजाने मतदान केले, याची फळे त्याला आज आणि पुढे भोगावी लागणार आहेत. या संकटाकडे कुणाचेच लक्ष नव्हते का ? लक्ष होते. ज्यांचे नाव आजही दुर्लक्षित होत आहे, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या संकटाकडे हिंदु समाजाचे लक्ष वेधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता. भारताला स्थैर्य देण्यासाठी या जिहादी कारवायांना अत्यंत कडक उपायांनी मुळासकट उपटून काढण्याने ते स्थैर्य मिळेल, हा या लेखाचा हेतू आहे. आता सावरकरांनी या विषयासंबंधी कशी चेतावणी दिली होती, ते येथे देत आहोत.

‘ईशान्य भारतात इस्लामी राज्य निर्माण करण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेने ‘ब्ल्यू प्रिंट’ (आराखडा) सिद्ध केली आहे.’

– माणिक सरकार, मुख्यमंत्री, त्रिपुरा (‘सामना’ २९.८.१९९९)

(या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उधृत केलेली आसाममधील घुसखोरांविषयीची स्थिती जरी वर्ष १९४१ मधील असली, तरी आताही समस्या आणखी भयावह झाली आहे. आताचे सरकार घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी प्रयत्नरत आहे. असे असले, तरी घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या समस्या आणि त्यामुळे देशाला वाढत असलेला धोका लक्षात घेता त्यांना तात्काळ बांगलादेश वा त्यांच्या त्यांच्या देशात हाकलून लावले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)

१. घुसखोरीद्वारे आसाममधील मुसलमानांची लोकसंख्या वाढवण्याचे षड्यंत्र असल्याचे आणि ते कसे उधळायचे, हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

८ जुलै १९४१ या दिवशी ‘हिंदु आसाम इन डेंजर’ (हिंदु आसाम संकटात) या शीर्षकाखाली सावरकरांनी एक पत्रक काढले. त्यात ते म्हणाले, ‘आसाममधील हिंदूंची बहुसंख्या संपून तो मुसलमान बहुसंख्यांकांचा प्रांत होण्याचे जे भयानक संकट उभे होत आहे, त्याकडे मी हिंदु जगताचे आणि आसाममधल्या हिंदूंचे मुद्दाम लक्ष वेधत आहे. बंगाल आणि इतर प्रांतांतल्या मुसलमानांना आसाममध्ये वसाहती करण्यास लावून तेथील मुसलमानांची लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्याची योजना अनेक वर्षांमागे आखण्यात आली असून ती पद्धतशीरपणे कार्यान्वित केली जात आहे. तिला साहाय्य म्हणून विधानसभेने ‘ए लँड डेव्हलपमेंट स्किम ॲक्ट’ (भूमी विकास योजना कायदा) या नावाचा कायदा सिद्ध केला होता. ‘या कायद्याचा लाभ घेणे, हे हिंदू वसाहतकारांना अवघड केले जाते’, अशा तऱ्हेची तक्रार हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. तरीही या प्रांतात काँग्रेस पक्षाचे शासन असतांना हिंदू मतदारांनी त्यांच्या हिताच्या रक्षणार्थ ज्या हिंदू मंत्र्यांना निवडून दिले, त्यांच्या काँग्रेसी मंत्रीमंडळाने दुसऱ्या प्रांतातील मुसलमान वसाहतकारांच्या घुसखोरीला प्रतिबंध केला नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. चूक सुधारण्यास अजूनही वेळ आहे; कारण सुदैवाने आसाममध्ये हिंदू बहुसंख्य आहेत. भारतातील हिंदू, विशेषत: आसाममधील हिंदू हे जागृत झाले आणि ज्या प्रकारे भूमी विकासाची योजना कार्यान्वित केली जात आहे, तिला जर त्यांनी प्रखर विरोध केला, तर या दुष्ट गोष्टीचा अंत करता येईल. आणखी सुदैवाची गोष्ट म्हणजे उपाययोजनाही हाताशी आहे. आता एक क्षणाचाही विलंब न लावता जर आसामी हिंदूंनी भूमी विकासाची योजना कार्यान्वित करणारे जे हिंदूविरोधी प्रशासन आहे त्याच्याविरुद्ध आणि त्या कायद्यांविरुद्ध हिंदू महासभेच्या नेतृृत्वाखाली चळवळ चालू केली, तर हिंदू प्रांतात मुसलमानांची जी पद्धतशीर वसाहत होत आहे त्या संकटापासून आसामी हिंदू मुक्त होतील.

२. आसामी हिंदूंना स्वरक्षणार्थ सावरकर यांनी या पत्रकात सांगितलेल्या तीन गोष्टी

अ. काँग्रेस आणि तिचे तत्त्वज्ञान यांविषयी वाटणाऱ्या ममत्वापासून आसामी हिंदूंनी स्वत:स मुक्त करून घ्यावे; कारण स्वत:च्या तत्त्वज्ञानामुळे आणि गांधीवादी लोकांची त्या पक्षावर पकड असल्यामुळे हिंदूंच्या अधिकारासाठी हिंदू म्हणून काँग्रेस कधीही लढणार नाही.

आ. आसाममधल्या हिंदूंनी हिंदू महासभेला पाठिंबा दिला पाहिजे; कारण भारतातल्या सर्व संस्थांपैकी ती एकच संस्था अशी आहे की, जिने येऊ घातलेले संकट पाहिले आणि त्याविरुद्ध गर्जना केली अन् तीच संस्था उघडपणे आणि तडजोड न करता आसाममधल्या हिंदूंच्या हिताचे रक्षण करील. आसाम आणि आसाममधल्या डोंगरात रहाणाऱ्या हिंदू वन्यजाती अन् भोवतालच्या प्रांतातील बुद्धिमान आणि कष्टाळू हिंदू शेतकरी वसाहतीसाठी जी भूमी उपलब्ध झाली आहे, त्यात निवास करून त्या भूमीची मशागत करतील, अशी नवीन योजना आसाममधल्या हिंदू नेत्यांनी सिद्ध करून ती कार्यवाहीत आणली पाहिजे.

इ. हिंदूंनी हे ध्यानात ठेवायला हवे की, या आणि इतर गोष्टींत इतरांच्या कृत्यामुळे त्यांची जी गाऱ्हाणी निर्माण झाली आहेत ती रडून आणि आक्रोश करून दूर होणार नाहीत. विरोधकांच्या युद्धतंत्राचे अवलंबन करूनच ते त्यांचा पराभव करू शकतील.’

(व्हर्लवींड प्रॉपगँड – संपादक अ.स. भिडे, पृष्ठ ४४३-४५१)

३. आसामधील मुसलमानांच्या घुसखोरीकडे दुर्लक्ष करणारे नेहरू !

सावरकर यांनी वर्ष १९४१ मध्ये आसामचा दौरा केला. या दौऱ्यात एका चर्चेत एका सद्गृहस्थाने सावरकर यांना असे सांगितले, ‘आसाममधील ओसाड भूमीवर मुसलमानांची वसाहत केली जात आहे आणि या योगे त्यांची वस्ती वाढल्यास हा प्रदेश पाकिस्तानला जोडला जाईल’, अशी भीती पंडित नेहरूंशी बोलून दाखवली. त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘निसर्गाला पोकळी रूचत नाही.’ त्यांच्या या बोलण्याचा रोख ओळखून सावरकर यांनी उत्तर दिले, ‘नेहरू हे तत्त्वज्ञ वा शास्त्रज्ञ नसल्याने निसर्गाला विषारी वायूचा तिटकारा असतो, हे त्यांना ठाऊक नाही.’

(श्री. बाळाराव सावरकर : स्वा. वीर सावरकर, अखंड हिंदुस्थान लढा पर्व (१९४१ ते १९४७) – पृष्ठ १६२)

४. आसाममधील घुसखोरांना हाकलण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना तार पाठवणारे सावरकर !

दुसरे महायुद्ध संपले. ब्रिटनने भारताच्या सत्तादानाचा निर्णय केला. वाटाघाटीनंतर भारताचे विभाजन करायचे ठरले. तेव्हा २ एप्रिल १९४७ या दिवशी ‘पाकिस्तानची चिरफाड करा’, या शीर्षकाखाली काढलेल्या पत्रकात सावरकर म्हणाले, ‘एक पश्चिम बंगालचा प्रांत निर्माण करा आणि दुसरे म्हणजे वाटेल ती किंमत देऊन आसाममधल्या मुसलमान घुसखोरांना हुसकून लावा.’ पुढे २४ दिवसांनी म्हणजे २६ एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आसामचे मुख्यमंत्री गोपीनाथ बाडोलाई यांना पुढील तार पाठवली, ‘आक्रमकांशी केलेल्या भिरूतेच्या तडजोडीमुळे हिंदु संघटनांच्या लोकांना चीड आलेली आहे. अशा तडजोडीमुळे आक्रमण वाढणार आहे. जुन्या आणि नवीन घुसखोरांना सरसकट हुसकून लावले पाहिजे.’ या तारेला वित्तमंत्री मेधी यांनी पुढील तार पाठवली, ‘आसामी जनतेच्या हिताला धक्का पोचणार नाही, याकडे लक्ष ठेवण्याच्या दायित्वाची आम्हाला जाणीव आहे आणि आसामी जनतेला आक्रमणापासून संरक्षण देण्याचा आमचा सतत प्रयत्न राहील. कुठल्याही बाजूने आलेले आक्रमण परतवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येईल.’ (हिस्टॉरिक स्टेटमेंटस् : पृ. १९५-१९६) या संबंधात आसाम शासनाने पुढे काय केले ? आणि त्यात केंद्र सरकारने कशी खिळ घातली ? याची माहिती मिळवण्यासाठी जिज्ञासू वाचकांनी व्ही.आय.के. सरीन यांचा ‘इंडियाज नॉर्थ इस्ट फ्लेम्स’ हा ग्रंथ वाचावा.

५. सावरकर यांच्या चेतावणीकडे सत्तापिपासू काँग्रेस आणि निष्क्रीय हिंदू यांचे दुर्लक्ष !

सावरकर यांच्या चेतावणीकडे सत्तापिपासू काँग्रेस आणि इतर नेते अन् मृत वंशासारखे वागणारे हिंदू लोक यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हा घुसखोरीच्या कर्करोगाचा विळखा विक्राळ झाला आहे. याची कल्पना पुढील वार्तेवरून येईल. त्या वार्तेचे शीर्षक आहे, ‘आसाम आस्कस् फॉर हेल्प टू काऊंटर आय.एस्.आय. थ्रेट.’ (आय.एस्.आय.च्या धमकीला प्रत्युत्तर देण्यासाठी आसाम साहाय्य मागत आहे.) त्यात म्हटले आहे, आसामच्या शासनाने केंद्रशासनाला एक संदेश पाठवला आहे, ‘राज्यात आय.एस्.आय.च्या कारवायांना तोंड देण्यासाठी एक दीर्घकालीन योजना आखावी.’ बाकी हे कार्य केंद्रावर सोपवून आसामी जनतेला या कर्करोगापासून मुक्ती मिळणार नाही. त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. मुक्ती मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या हातातील साधनांचा उपयोग करावा. सगळ्या घुसखोरांवर सामाजिक बहिष्कार टाकावा आणि शासनाने कडक पावले उचलावीत, यासाठी हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या सर्व पक्षांना मग ती काँग्रेस असो कि गणतंत्र परिषद असो, ‘आपले मत मिळणार नाही’, असे घोषित करावे.

हे इतर राज्यांतील हिंदू लोकही करू शकतात. पहा काय परिणाम होतो तो ? ‘फेरीवाल्यांकडून सामान विकत घेतले नाही की, तो ज्या जागेवर उभा आहे ती जागा सोडेल.’

६. आसामच्या लोकसंख्येत मुसलमानांच्या वाढीचे प्रमाण अधिक !

आसामची लोकसंख्येची स्थिती दाखवते की, आर्थिक विस्थापितांनी मोठी घुसखोरी केली आहे. त्यामुळे हिंसाचार वाढला आहे, असे दिसते. मुसलमान लोकसंख्येत ७७.४२ टक्के वाढ झाली आहे. हिंदूंच्या लोकसंख्येत ४१.८९ टक्के वाढ झाली आहे. या घुसखोरांमध्ये विस्थापितांपैकी असणाऱ्या आय.एस्.आय.च्या हस्तकाला मिसळून जाणे शक्य होते. भीतीचे सखोल कारण दुसरेच आहे. आतंकवाद्यांचा अंतिम उद्देश इस्लामी भारताची  स्थापना करणे, हा आहे. ते म्हणतात, ‘आम्ही अल्लासाठी लढत आहोत, पाकिस्तानसाठी नाही.’

७. पुढील वार्तांतील काही लिखाण

अ. मुंबईसह देशातील मुसलमान वस्त्यांमध्ये आय.एस्आय.चे धोकादायक आतंकवादी : आय.एस्.आय.ने त्याचे आतंकवादी घुसवले आहेत त्यात आंध्रतील भाग्यनगर (हैद्राबाद), कुर्नुल, केरळमधील कन्नूर, हरियाणातील मेवात, उत्तरप्रदेशातील बागपत, मुझफ्फरनगर, अमरोह, मेरठ, मोरादाबाद, तसेच मुंबई आणि उपनगर या भागांचा समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

(दैनिक ‘सामना’ २३.८.१९९९)

आ. भारतात प्रतिदिन १ सहस्र बांगलादेशीयांची घुसखोरी : देशात अवैधपणे रहाणाऱ्या बांगलादेशीयांची संख्या १ कोटी २० लाख ते १ कोटी ५० लाख या संख्येत आहे. वर्ष १९७१ च्या बांगलादेशाच्या युद्धापूर्वीही मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालूच होती. आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या प्रचंड आहे. विशेष म्हणजे काही जणांची नावे मतदार सूचीमध्येही आहेत. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ही मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

(दैनिक ‘सामना’, २४.८.१९९९)

इ. आय.एस्.आय.चे २१ सहस्र भारतीय हस्तक : आय.एस्.आय.ने २१ सहस्र भारतीय हस्तकांना गेल्या ११ वर्षांत नोकरीस ठेवले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या गुप्त अहवालात ही गोष्ट नमूद केली जाते. यात म्हटले आहे की, उत्तर बंगाल आणि मुर्शिदाबाद येथून स्थानिक लोकांना हस्तक म्हणून आय.एस्.आय. भरती करते. बांगलादेशमधून घुसखोरी होत असल्याने हा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. गृहराज्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी मान्य केले की, आय.एस्.आय.च्या कारवाया वाढल्या आहेत.

(दैनिक ‘दि एशियन एज’, २६.८.१९९९)

जी गोष्ट जगाला गेली ५० वर्षे ठाऊक आहे ती बुद्धदेव भट्टाचार्य या साम्यवादी नेत्याला मान्य करण्यास आता वेळ मिळाला !

ई.  ‘उलेमा’चा फतवा – ‘इटालियन पाठिंबा’ : कारागृहात खितपत पडलेल्या ‘टाडा’ (आतंकवादविरोधी कायदा) आरोपींना खटले न चालवता सोडून देण्याची, तसेच ‘टाडा’ खटल्याची सुनावणी गतीने करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी मान्य केली आहे. याखेरीज भारतीय सैन्य आणि अन्य सुरक्षादल यांतही मुसलमानांना राखीव जागा देण्याची हमी सोनिया गांधी यांनी दिली.’

(दैनिक ‘सामना’ २५.८.१९९९)

उ. ‘हैद्राबाद : बॅटल ऑफ चार मिनार’ (हैद्राबाद : चार मिनराची लढाई) : ‘इंडिया टुडेच्या’ ६.९.१९९९ या दिवशीच्या अंकात ‘हैद्राबाद : बॅटल ऑफ चार मिनार’ (हैद्राबाद : चार मिनराची लढाई)’ या शीर्षकाखाली एक छोटे वार्तापत्र आहे. त्यात सलाहुद्दिन ओवैसी यांची मुक्ताफळे दिली आहेत. ते म्हणाले, ‘वुई आर द पीपल हू गेव्ह इंडिया ताजमहल अँड द रेड फोर्ट.’ (भारताला ‘ताजमहाल’ आणि ‘लाल किल्ला’ देणारी आम्ही माणसे आहोत.) कुतूबमिनारचा उल्लेख त्यांनी टाळला. तेव्हा तो हिंदूंनी बांधला असावा, या तर्कास पुष्टी मिळते; पण भारतात राहून या गृहस्थाला अजंठा-एलोरा, मिनाक्षी मंदिर, गिरनारवरची जैन मंदिरे, गीता, उपनिषदे, कालिदासाचे ‘शाकुंतल’ या गोष्टींचे ज्ञान नसावे, हे कशाचे निदर्शक आहे ? राष्ट्रवादात परंपरेला मोठे स्थान असते.

ऊ. ‘क्रिकेटमुळे भारत-पाक संबंध सुधारतील’, असे म्हणणाऱ्यांना पाकिस्तानी लेखकाची चपराक ! : १.९.१९९९ या दिवशीच्या ‘दी एशियन एज’च्या अंकात ‘द अनहेल्दी काँबिनेशन ऑफ स्पोर्टस् अँड पॉलिटिक्स’ (खेळ आणि राजकारण यांची अनारोग्य युती) या शीर्षकाखाली ओमर कुरेशी यांचा लेख आहे. त्यातला शेवटचा परिच्छेद उधृत करतो. ‘युद्धमान असणाऱ्या राष्ट्रात खेळांमुळे तणाव न्यून होईल, हे एक ‘रोमॅन्टिक मिथ’ (दंतकथा) आहे.’ पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पहाता खेळामुळे हा तणाव वाढेल. क्रिकेटच्या दौऱ्यासाठी मी जगभर हिंडलो आहे. या दौऱ्यामुंळे राजकीय संबंध सुधारण्यास साहाय्य झाले, असे मी सत्यपणे सांगू शकत नाही.

ए. युद्धज्ञान : ‘क्विन्टस फेबिअस मॅक्झिमस हा रोमन राजकारणी आणि सेनापती होता. त्याच्याविषयी प्लुटार्क लिहितो, ‘हातघाईची लढाई’ करावयाची नाही, असा त्याचा निश्चय होता. काळ, मनुष्यबळ आणि द्रव्यबळ त्याच्याकडे होते, तेव्हा शत्रूचे बळ हे त्याक्षणी अधिक असल्याने त्याने दिरंगाईचे रणतंत्र वापरण्याची योजना आखली. शत्रूचे छोटे सैन्य आणि अल्पसामुग्री संपवण्याचे त्याने ठरवले. धाडसी सेनानी सुदैैवी ठरेल; पण धाडसी नसलेला कोणताही सेनानी सुदैवी असणार नाही.’ – फिल्ड मार्शल अर्ल वेव्हेल.’

– ज. द. जोगळेकर (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑक्टोबर १९९९)