पुलवामामध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात पोलीस शिपाई ठार

आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस शिपाई रियाझ अहमद ठोकर ठार (चित्र सौजन्य : republicworld.com)

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथील गुडूरा या गावात आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस शिपाई रियाझ अहमद ठोकर ठार झाला. (याद्वारे जिहादी आतंकवादी हे पोलीस आणि प्रशासन यांना ‘काश्मीरमध्ये अद्यापही आमचेच राज्य आहे’, असेच दाखवून देत आहेत. जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे ! – संपादक)

आतंकवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षादलांनी परिसराला वेढा घातला आहे.