वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जे घडले, तेच राजस्थानमधील करौली, मध्यप्रदेशमधील खरगोन आणि देशभर चालू आहे. हिंदु समाजाने जागृत होण्याची आवश्यकता आहे. आपल्या तेजस्वी राष्ट्रपुरुषांचा आणि पराक्रमी राजांचा इतिहास आठवण्याची आवश्यकता आहे. पलायन नव्हे, तर प्रतिकार करणे, हाच एकमेव उपाय आहे. जोपर्यंत सरकारची इच्छाशक्ती नसेल, तोपर्यंत दंगलखोरांवर काही कारवाई होत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. दंगलखोरांवर कारवाईसाठी शासनाकडे तक्रारी, पत्रव्यवहार, माहितीचा अधिकार, न्यायालयीन लढा आदी माध्यमांतून दबाव निर्माण केला पाहिजे.
– अधिवक्ता नीलेश सांगोलकर