चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी चोरी !

खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर – येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी चोरी झाली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. शंकर नेवारे, तन्वीर बेग आणि रोहित इमलकर अशी त्यांची नावे आहेत. चोरट्यांनी खासदाराच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला; मात्र चोरांच्या हाती काहीही ऐवज लागला नाही. त्यामुळेच त्यांनी संतापून बंगल्यातील वस्तूंची नासधूस आणि सामानाची तोडफोड केली.

संपादकीय भूमिका

खासदारांच्या घरी चोरी होते, तेथे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा !