कुतूबमिनार परिसरातील २७ मंदिरे पाडून मशीद बनवण्यात आली, हे ऐतिहासिक सत्य ! – प्रसिद्ध पुरातत्वज्ञ के.के. महंमद

मुसलमान आक्रमकांनी देशातील सहस्रो मंदिरांना पाडून तेथे मशिदी उभारल्या आहेत, हे सत्यही आता समोर आणणे आवश्यक !

प्रसिद्ध पुरातत्वज्ञ के.के. महंमद

भोपाळ (मध्यप्रदेश) – देहलीतील कुतूबमिनार येथील २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून तेथे सध्या असलेली ‘कुव्वत उल इस्लाम मशीद’ बांधण्यात आली, अशी माहिती प्रसिद्ध पुरातत्वज्ञ के.के. महंमद यांनी दिली आहे. ‘मंदिरे पाडल्यानंतर त्यांच्याच दगडांच्या साहाय्याने ही मशीद बांधण्यात आली. तेथे अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आहे’, असेही त्यांनी सांगितले. ते येथे पुरातत्व विभागाने आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत होते. महंमद यांनीच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी खोदकाम करून ‘तेथे पूर्वी श्रीराममंदिर होते’, हे सिद्ध केले होते. त्या आधारेच सर्वोच्च न्यायालयाने तेथे पूर्वी मंदिर असल्याचे मान्य केले होते.

के.के. महंमद पुढे म्हणाले की, कुतूबमिनारजवळ मंदिराचे जे अवशेष मिळाले आहेत, त्यात श्री गणेशाच्या अनेक मूर्ती आहेत. यातून तेथे श्री गणेश मंदिर होते, हे सिद्ध होते. ‘ताजूर मासिर’ नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.