वॉशिंग्टन (अमेरिका) – सर्व राजकीय विचारसरणींच्या अमेरिकी नागरिकांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे जगातील सर्वांत मोठे खलनायक आहेत, असे वाटते. ही माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. पुतिन यांच्याविना जग अधिक सुरक्षित राहू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे; परंतु रिपब्लिकन पक्षाच्या अनेक समर्थकांचे जो बायडेन यांच्यासंदर्भातही असेच मत आहे.
‘मॉर्निंग कन्सल्ट’ या सर्वेक्षण करणार्या प्रसिद्ध आस्थापनाने हे सर्वेक्षण केले असून त्यानुसार ८३ टक्के अमेरिकी नागरिकांचे पुतिन यांच्याविषयी नकारात्मक मत आहे. जगभरातील नेत्यांमध्ये ‘खलनायक’ म्हणून प्रतिमा असलेल्यांमध्ये पुतिन यांच्यानंतर उत्तर कोरियाचे किम जोंग उन (७८ टक्के), चीनचे शी जिनपिंग (५९ टक्के) आणि अमेरिकेचे जो बायडेन (५१ टक्के) यांची नावे येतात.