|
मुंबई – भोंग्यांसंदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले, ‘‘पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येणार आहे. याविषयी मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कुणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’’
भोंग्याच्या सूत्रावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी अनुमती घेणे अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.