राष्ट्रीय मारुति मंदिर (पुणे) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

राष्ट्रीय मारुति मंदिर (पुणे) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

  • हनुमान जयंतीच्या दिवशी होणारी इफ्तार पार्टी एक दिवस आधीच उरकली !

  • मशिदीत हनुमान चालिसाचे आयोजन करून खरा सर्वधर्मसमभाव दाखवण्याची हिंदुत्वनिष्ठांची आयोजकांकडे मागणी

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाचा परिणाम ! – संपादक

पुणे – राष्ट्रीय मारुति मंदिर (साखळीपीर) येथे रवींद्र माळवदकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून १५ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन १६ एप्रिल या दिवशी करण्यात येणार असल्याची चर्चा होती. याला विरोध म्हणून बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु महासंघ यांसारख्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करत पोलिसांना त्या कार्यक्रमाला अनुमती न देण्याविषयीचे आवेदन दिले होते. त्यानंतर इफ्तार पार्टी १६ एप्रिलऐवजी १५ एप्रिलच्या संध्याकाळीच उरकण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे सर्वच हिंदुत्वनिष्ठ संतप्त आहेत. ‘अशा प्रकारे मशिदींमधून हनुमान चालिसाचे आयोजन करून खरा सर्वधर्मसमभाव दाखवावा’, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठांनी केले आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे मंदिरात होणार असलेली इफ्तार पार्टी शेवटी मंदिराबाहेर करण्यात आली.