गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा आणि वास्तूदोष दूर होतात ! – उत्तरप्रदेशचे मंत्री धरमपाल सिंह

उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री धरमपाल सिंह (मध्यभागी)

मेरठ (उत्तरप्रदेश) –  गायीमुळे आपल्याला दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र, असे ५ पदार्थ मिळतात. गायीच्या शेणात लक्ष्मी, तर गोमूत्रात गंगामैया वास करते. गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा किंवा वास्तुदोष यांसारख्या समस्या दूर होतात, असे विधान उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री धरमपाल सिंह यांनी केलेे. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, राज्यभरात रस्त्यांवर फिरणार्‍या प्राण्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात ‘चारा बँक’ स्थापन करण्याची योजना आहे. गायीचे शेण विकून सी.एन्.जी. इंधनाचे उत्पादन करण्याची योजना आहे. याद्वारे पैसाही मिळेल. दूध देणार्‍या गायींचे पालनपोषण तर केले जातेच; पण या योजनेमुळे दूध न देणार्‍या गायींचेही पालनपोषण केले जाईल.