युक्रेनला साहाय्य केल्यास तुम्हाला नष्ट करू !

व्लादिमिर पुतिन यांची ‘नाटो’च्या सदस्य देशांना धमकी

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन

कीव/मॉस्को – रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू होऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत. ५० व्या दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘नाटो’च्या (‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी असोसिएशन’च्या) सदस्य देशांना सुनावले, ‘जर तुम्ही युक्रेनला साहाय्य केले, तर आम्ही तुम्हाला नष्ट करू ! तुमची वाहने आणि शस्त्रास्त्रे यांना नष्ट केले जाईल.’ दुसरीकडे ऑस्ट्रलियाने रशिया सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या १४ महत्त्वपूर्ण आस्थापनांवर स्वत:च्या देशात बंदी लादली आहे.

युद्धामुळे अनेक गरीब देश नष्ट होण्याचे संकट ! – संयुक्त राष्ट्रे

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे अनेक गरीब देश नष्ट होण्याची शक्यता आहे. या देशांवर आर्थिक संकट ओढावण्यासमवेतच खाद्य आणि ऊर्जा क्षेत्रांतही संकट निर्माण होऊ शकते, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांनी दिली.