परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समाजाविषयी मार्गदर्शन

म्हातारपणात ऐकू कमी येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘म्हातारपणात विविध अवयवांची क्षमता अल्प होते, तसेच ऐकू येण्याची क्षमताही न्यून होते. त्यामुळे इतरांचे बोलणे ऐकू येईनासे झाले की, वयस्करांना ‘इतर इतक्या हळू आवाजात का बोलतात ?’, असा प्रश्न पडतो; पण ‘स्वतःची ऐकण्याची क्षमता अल्प झाली आहे’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे मीही अनुभवतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१०.२०२१)    


‘व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब, तिचे झोपेपुढे काही चालत नाही. झोप आली की, तिला झोपावेच लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.२.२०२२)   


‘आपण देवाच्या नावे सर्व करतो, तसे देवही आपल्या नावे सर्व करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.२.२०२२)