परेच्छेने वागणार्‍या आणि साधनेची तीव्र तळमळ असणार्‍या ओडिशा येथील सुश्री (कु.) सुनीता छत्तर !

परेच्छेने वागणार्‍या आणि साधनेची तीव्र तळमळ असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या ओडिशा येथील सुश्री (कु.) सुनीता छत्तर (वय ४२ वर्षे) !

सुश्री (कु.) सुनीता छत्तर

१. व्यष्टी साधना गांभीर्याने करणे

सुनीताताई व्यष्टी साधनेचे प्रयत्न सातत्याने आणि गांभीर्याने करतात. त्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्नही कठोरपणे करतात. त्या नियमित सारणी लिखाण करतात. त्या व्यष्टी साधनेचा आढावा प्रामाणिकपणे आणि नियमित देतात.

सौ. श्रेया प्रभु

२. विचारण्याची वृत्ती

अ. त्या पू. नीलेश सिंगबाळ यांना साधनेत आलेल्या अडचणी आणि त्यांचे प्रयत्न यांविषयी विचारतात.

आ. ताई साधनेत येणार्‍या अडचणींविषयी उत्तरदायी साधकांना मनमोकळेपणाने विचारतात. त्यांची साधनेची तळमळ पाहून आमची भावजागृती होते.

३. सेवाभाव

३ अ. सवलत न घेणे : ताईंची पाठ दुखत असतांनाही त्या शक्य तेवढा वेळ सेवा करतात. कधी तीव्र वेदनांमुळे त्यांना सेवेला येण्यास विलंब झाला, तर त्या तेवढा वेळ अधिक थांबून सेवा पूर्ण करतात.

३ आ. प्रत्येक सेवा मन लावून आणि झोकून देऊन करणे : ताई त्यांना सांगितलेली सेवा मन लावून आणि समर्पणभावाने झोकून देऊन करतात. त्या प्रत्येक सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी करण्याचा प्रयत्न करतात. महाप्रसाद बनवतांना कधी विलंब झाला, तर त्या त्यामागील कारण शोधून काढतात आणि ‘पुन्हा तशी चूक होऊ नये’, यासाठी प्रयत्न करतात.

४. संतांप्रती भाव

एकदा वाराणसी सेवाकेंद्रात एक संत येणार होते. तेव्हा ताईंनी त्यांच्या भोजनाची पूर्वसिद्धता परिपूर्ण आणि मनापासून केली. त्यांनी भोजनकक्षाच्या बाहेरील स्वच्छतेची सेवा, भांडी घासण्याची सेवा करून भोजन बनवणार्‍या साधकांना साहाय्य केले. या सेवा करतांना त्यांच्या मनात ‘संतसेवेची संधी मिळाली आहे’, असा भाव होता.

साधनेची तीव्र तळमळ आणि गुणसंपन्न असणार्‍या साधिकेच्या समवेत आम्हाला रहायला मिळत आहे अन् त्यांच्याकडून शिकायला मिळत आहे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.

– सौ. श्रेया प्रभु, वाराणसी सेवाकेंद्र (७.१.२०२२)

सुश्री (कु.) सुनीता छत्तर