|
|
अंबड (जिल्हा जालना) – किरकोळ कारणावरून येथे १५ धर्मांध युवकांनी १२ मार्च या दिवशी येथील रामेश्वर अंकुश खरात या हिंदु युवकावर लोखंडी सळ्या आणि लाकडी काठ्या यांद्वारे आक्रमण केले. यानंतर त्याला उपचारार्थ स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु दुसर्या दिवशी सायंकाळी ६ वाजता रामेश्वर याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गावकर्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. दुपारी ४.३० वाजता ही घटना घडल्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत गावकरी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत होते. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी १४ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि व्यापारी वर्ग यांच्या पुढाकाराने गावातील बाजार बंद ठेवण्यात आला होता. (अन्यायाविरोधात एकत्र आलेले हिंदुत्वनिष्ठ, गावकरी आणि व्यापारी यांचे अभिनंदन ! – संपादक) रामेश्वर याचा झुंडबळी घेणार्यांत १५ जण सहभागी असले, तरी आतापर्यंत केवळ ९ आरोपींना अटक केल्याचे वृत्त आहे
Maharashtra: A mob of Islamists lynches a youth Rameshwar Kharat over a minor dispute in Ambad townhttps://t.co/QF7ZU0FPfV
— OpIndia.com (@OpIndia_com) March 17, 2022
येथील स्वयंभू महादेव मंदिराशेजारी असलेल्या विहिरीत दुपारी १ वाजता रामेश्वर अन्य एकासमवेत पोहायला गेला होता. त्या वेळी पोहण्यावरून वाद होऊन धर्मांधांनी त्याला ‘जर या परिसरात दिसलास, तर तुला मारून टाकू’ अशी धमकी दिली. याविषयी रामेश्वर याने त्याच्या चुलत भावाला सांगितले होते. त्यानंतर रामेश्वर संध्याकाळी पठाण मोहल्ला या भागातून जात असतांना खलील मौलाना यांच्या दुकानासमोर त्याला धर्मांधांच्या जमावाने अडवले आणि शिवीगाळ केली. शोएब सुलानी आणि शफीक सुलानी या मुलांनी त्याला लोखंडी सळईने अन् अन्य मुलांनी काठीने मारले. या आक्रमणात रामेश्वर गंभीर घायाळ आणि बेशुद्ध पडला.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, व्यापारी संघ, धनगर समाज यांच्यासह अन्य संघटना १४ मार्च या दिवशीच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी हिंदुत्वनिष्ठांची समजूत घातली. हिंदुत्वनिष्ठांचा दबाव वाढल्यानेच शेवटी पोलिसांना धर्मांध आरोपींना अटक करणे भाग पडले. इब्राहीम सिराज शेख, अदनान सुलानी, शफीक सुलानी, शोहेब सुलानी, अजहर एजाज अली शेख, फैजान अहमद पठाण, अरबाज शाह महंमद पठाण, मुरादी मेहरा शेख, आवेज सिराज शेख, शोहैल शाह, महंमद पठाण, अनिस गफ्फार शेख, वाजिद इस्माइल शेख, अमीर चांद पठाण, अरशद खुर्शीद जिलानी अशी हत्येत सहभागी असलेल्यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत.
श्री. अंकुश यांचा परिवार गरीब असून रामेश्वर हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. सरकारने अद्याप त्यांना कोणत्याही साहाय्याची घोषणाही केलेली नाही.
रामेश्वर याचे वडील अंकुश खरात यांचा हिंदु धार्मिक सेवाकार्यात पुढाकार असतो. त्यामुळे जिहादी विचारसरणीच्या धर्मांधांनी त्यांना लक्ष्य केले होते. ही गोष्ट आतापर्यंत स्पष्ट झाली आहे. त्यामुळे छोट्याशा गोष्टीचे सूत्र बनवून हिंदुत्वनिष्ठाच्या मुलाचा झुंडबळी घेतल्याचे पुढे येत आहे.