नगरपालिका प्रशासन या कर्मचार्यांविरुद्ध काय कारवाई करणार, हे पुढे आले पाहिजे ! – संपादक
ठाणे, १८ मार्च (वार्ता.) – अंबरनाथ शहरातील आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळावे, तसेच अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावेत, यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करून ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ अर्थात् ‘यू.पी.एस्.सी. भवना’ची निर्मिती केली आहे. याच यू.पी.एस्.सी. भवनामध्ये नगरपालिकेच्या कर्मचार्यांकडून दारूची ‘पार्टी’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे.
कोरोनाच्या काळात हे यू.पी.एस्.सी. केंद्र बंद नव्हते. विशेष म्हणजे या इमारतीच्या संरक्षणासाठी नगरपालिकेच्या वतीने सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत; मात्र अशा प्रकारच्या दारूच्या मेजवान्या या इमारतीत होत असतील, तर हे सुरक्षारक्षक नेमके करतात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.