उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

तोडूनी भवपाश नेतसे आम्हा विष्णुलोकी ।
बनूनी आमुची जननी अर्पिते आम्हा श्रीविष्णुचरणी ।।
भावभक्तीची शिदोरी सोबत बांधोनिया देतसे ।
भाग्यवान आम्ही लाभले ऐसे सद्गुरु आम्हासी ।। १ ।।
म्हणतसे बाळा,
तुझे हृदयी भगवंत वास करी ।
उघडूनी ज्ञानचक्षू दर्शन घे सत्वरी ।।
घाल लोटांगण, वंदन कर चरण ।
भावभक्तीने कर चरणपूजन ।।
समर्पणाचे दे दृढ आलिंगन ।
हेच तुझे सर्वस्व आहे जाण ।।
वाट दावण्या आम्हा सदैव तत्पर, भान नसे कष्टाचेही ।
भाग्यवान आम्ही लाभले ऐसे सद्गुरु आम्हासी ।। २ ।।
प्रीती अशी ही मायमाऊलीची ।
प्रेरणा नित्य देती भगवंताला अनुभवण्याची ।
निष्ठा, श्रद्धा अन् समर्पणाने गुरुसेवेची धडपड जागवी ।
सर्वांवरी निरपेक्ष प्रीती करूनी ।
सदैव आम्हा आनंदी करती ।
सद्गुरु ताई, तुमच्या छायेखाली निश्चिंत आहो आम्ही ।। ३ ।।
माऊली, तुमच्या चरणी कृतज्ञता या अज्ञानी लेकरांची ।
आतूर झालो तव चरणी लीन होण्यास ।।
द्या आशिष आम्हा श्री गुरुचरणी एकरूप होण्यास ।। ४ ।।
– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (२८.३.२०२१)
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !