
१. वेळेचे गांभीर्य
‘आम्ही श्री. पारेखसरांकडे जाण्यापूर्वी त्यांना विचारून भेटण्याची वेळ (‘अपॉइंटमेंट’) ठरवतो. त्या वेळी ते आमच्या आधी कार्यालयात उपस्थित असतात.
२. इतरांचा विचार करणे

‘पारेखसरांना कार्यालयात येण्यास कधी उशीर झाला किंवा त्यांची नियोजित भेट रहित झाली’, असे अजूनपर्यंत कधीही झाले नाही. त्यांना काही वेळा अकस्मात् कामासाठी बाहेर जावे लागणार असेल, तर ते स्वतःहून भ्रमणभाष करून आम्हाला तसे सांगतात. आमचे त्यांना भेटण्याचे ठरले असूनही आम्हाला काही कारणास्तव त्या वेळी जाणे शक्य नसल्यास आम्ही त्यांना तसे कळवल्यावर ते आम्हाला समजून घेतात.
३. शांत आणि स्थिर
आम्ही पारेखसरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जातो. त्या वेळी त्यांच्याकडे कामाची कितीही तातडी असली, तरीही ते पुष्कळ शांत आणि स्थिर असतात. ते काम करत असतांना त्यांच्या कार्यालयातील कुणीही त्यांना काही विचारले, तरीही ते त्यांना शांतपणे उत्तर देतात.
४. ते आश्रमातील साधकांचीही आवर्जून विचारपूस करतात.
५. सेवेच्या संबंधित परिपूर्ण अभ्यास करणे
आम्ही त्यांना सेवेच्या संदर्भात सांगितल्यावर त्यातील त्रुटी त्यांच्या त्वरित लक्षात येतात. ते आम्हाला नेमकेपणाने त्याच सूत्राविषयी विचारतात आणि त्याविषयी अचूकतेने सांगतात. तेव्हा ‘त्यांचा अभ्यास किती परिपूर्ण आहे’, हे आम्हाला शिकायला मिळते. आम्ही त्यांना एखादे सूत्र विचारले आणि त्यांना त्याविषयी काही शंका असल्यास ते स्वतःहून त्या क्षेत्रातील तज्ञांना विचारून निश्चिती करतात आणि आम्हाला त्याविषयी कळवतात.
६. प्रसिद्धी पराङ्मुख आणि अल्प अहं

अ. श्री. पारेख यांची सनदी लेखापाल म्हणून मोठी ‘फर्म’आहे. ते अनेक वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत; मात्र त्यांच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून अहं जराही जाणवत नाही.
आ. ‘ते आम्हाला साहाय्य करत असल्याविषयी त्यांच्या मनात जराही कर्तेपणा जाणवत नाही. त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असल्याने ते निरपेक्षपणे सेवा करत आहेत.
इ. ते ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आणि श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ यांसारख्या कार्यक्रमांना उपस्थित रहातात; मात्र त्या वेळी ‘कार्यक्रमात मानसन्मान मिळावा’, अशी त्यांची कोणतीच अपेक्षा नसते.
७. श्री. पारेख यांच्यात जाणवलेले पालट
अ. पारेखसरांचा चेहरा पूर्वीपेक्षा आनंदी दिसतो. ते शांत आणि स्थिर वाटतात.
आ. आता ते मोकळेपणाने बोलतात.
इ. पूर्वी ते आमच्याशी केवळ सेवेच्या संदर्भातच बोलत असत. आता ते स्वतःहून आम्हाला संस्थेच्या कार्याविषयी विचारतात आणि जाणून घेतात.’
– सौ. तनुजा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३८ वर्षे) आणि श्री. संदीप सकपाळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.६.२०२६)
राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी समर्पित जीवन जगणारे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तीमत्त्व – मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (वय ६० वर्षे) !
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !
‘व्यावसायिकांची व्यवसायातून साधना व्हावी’, याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६३ वर्षे) !