
१. ‘श्रीमती वीरमतीबेन शुक्ल या पू. इंद्रवदन शुक्ल यांच्या पत्नी आहेत. त्यांचा विवाह बालवयातच झाला. विवाहानंतर त्यांनी घरातील सर्व दायित्व सांभाळले.
२. त्यांनी यजमानांना साधनेत साहाय्य कले. यजमानांच्या निधनानंतर त्या स्थिर राहिल्या.
३. स्वावलंबी
वीरमतीबेन यांचे वय ८९ वर्षे आहे. त्या त्यांच्या मुलाकडे (श्री. केतन शुक्ल यांच्याकडे) असतात. त्यांना ऐकू येत नाही आणि नीट बोलताही येत नाही. त्यांना विस्मरण होते. अशा स्थितीतही त्या स्वतःची सर्व कामे स्वतःच करतात. ‘आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये’, असे त्यांना वाटते. त्या कुणावरही आपला भार टाकत नाहीत.
४. प्रेमभाव
अ. त्यांना कुणी भेटायला गेले की, त्या त्यांची आणि कुटुंबियांची प्रेमाने विचारपूस करतात.
आ. पू. इंद्रवदन शुक्ल यांच्या एका शिष्याच्या मुलीचे अपघातात निधन झाले. वीरमतीबेन यांना गुडघेदुखीचा तीव्र त्रास आहे, तरीही त्या दोन माळे चढून त्या शिष्याच्या कुटुंबियांना भेटायला गेल्या.’
– श्री. संतोष आळशी, वापी, गुजरात. (२४.६.२०२६)
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !
‘व्यावसायिकांची व्यवसायातून साधना व्हावी’, याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६३ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन!