सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (वय ४४ वर्षे) यांनी साधनेविषयी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !

उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

उद्या, होळी पौर्णिमेच्या (१७.३.२०२२) दिवशी धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांनी सांगितलेली साधनेविषयीची अमूल्य सूत्रे पुढे दिली आहेत.

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. काळाचे महत्त्व

सध्याचा काळ साधनेसाठी अनुकूल असल्याने साधनेचे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे.

सौ. मनीषा पाठक

२. साधना करण्याचे महत्त्व

आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताचा भक्त होणे आवश्यक आहे. येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाता येण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.

३. कृतज्ञताभाव

अ. ‘देवाने आपल्याला सुदृढ शरीर दिले आहे’, याबद्दल साधकांनी सतत त्याच्या चरणी कृतज्ञ रहावे.

आ. ‘स्वतःतील अहं वाढू नये’, यासाठी साधकांनी देवाप्रती सतत कृतज्ञता व्यक्त करावी.

इ. ‘देवा, ‘तू मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे उच्च कोटीचे आणि अवतारी गुरु दिले आहेस’, त्याबद्दल मी क्षणोक्षणी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे’, अशी कृतज्ञता सतत व्यक्त करावी.

४. अन्य सूत्रे

अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे सातत्याने आनंदी रहाता येते.

आ. आपल्या साधनेच्या मार्गात कुणी कितीही काटे पेरले, तरी आपण त्यांच्याशी चांगलेच वागायला हवे.

इ. साधना करण्यासाठी संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल.

ई. परिस्थिती पालटली, तरी मनःस्थितीत पालट व्हायला नको.

उ. ध्येयाचा ध्यास असेल, तर कष्टांचा त्रास होत नाही.

– सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१.२०२२)