सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला बंगाल, सातारा आणि पुणे (महाराष्ट्र) येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक या सर्वांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली. गुरुदेवांची ज्ञानशक्ती आणि संतांचे लाभलेले मार्गदर्शन यांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा लाभ घेण्यासाठी समाजातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक अन् हितचिंतक मोठ्या संख्येने अभियानात कृतीशील सहभाग घेत आहेत. ‘हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांची ज्ञानगंगा प्रवाहित होऊन सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली.
सत्संगात येणार्या एका जिज्ञासूने भ्रमणभाष करून ग्रंथांची मागणी देणे आणि ते ग्रंथ वितरणासाठी त्यांच्या दुकानात ठेवणे‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’विषयी समजल्यानंतर ‘बंगाली ग्रंथांचे वितरण करू शकतो’, असा विचार माझ्या मनात तीव्रतेने आला. सत्संगात अभियानाविषयी सांगितल्यावर एका जिज्ञासूने भ्रमणभाष करून ग्रंथांची मागणी दिली. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘बंगाली ग्रंथांमध्ये पुष्कळ चांगली माहिती आहे. आपण ते ग्रंथ दुसर्यांना देऊ शकता.’’ तेव्हा त्यांनी त्वरित ग्रंथांची वाढीव मागणी दिली. त्यांनी त्यांच्या दुकानात ग्रंथ ठेवले आहेत. ते दुकानात येणार्या गिर्हाईकांना ग्रंथांविषयी सांगून ग्रंथांचे वितरण करत आहेत. जिज्ञासूंना ग्रंथांविषयी सांगितल्यानंतर ते त्वरित ग्रंथ घेण्यासाठी सिद्ध होत होते. ही सेवा करतांना मी अनुभवले, ‘मी काही करत नाही. गुरुदेवांनी सर्वांना आधीपासूनच सिद्ध करून ठेवले आहे.’ – श्रीमती बबिता गांगुली, कोलकाता, बंगाल. |
सौ. विद्या कदम, सातारा‘साधना सत्संगातील जिज्ञासू श्री. संतोष महामुलकर यांनी त्यांच्या आस्थापनातील कर्मचार्यांच्या मुलांना देण्यासाठी ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा !’, तसेच ‘श्री गणेश अथर्वशीर्ष अन् संकटनाशनस्तोत्र (अर्थासह)’ या ग्रंथांची मागणी दिली.’ |
सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
१. हितचिंतक श्री. प्रसाद डोंगरे यांनी आयुर्वेदाविषयीच्या ग्रंथांची मागणी देणे आणि त्यांना एका डोळ्याने दिसत नसूनही त्यांनी ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करणे
‘सिंहगड रस्ता येथील वाचक श्री. परिमल वैद्य यांनी सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रसाद डोंगरे यांना वर्ष २०२२ चे ‘सनातन पंचांग’ भेट दिले. तेव्हा श्री. डोंगरे यांनी स्थानिक साधकांना भेटण्यासाठी बोलावले. साधकांनी श्री. डोंगरे यांना ग्रंथसूची दाखवल्यानंतर त्यांनी आयुर्वेदाविषयीच्या ग्रंथांची मागणी दिली. ग्रंथ पाहून त्यांच्या पत्नी म्हणाल्या, ‘‘ग्रंथांचे मूल्य अधिक आहे.’’ त्या वेळी श्री. डोंगरे त्यांच्या पत्नीला म्हणाले, ‘‘ते ग्रंथ कुणी लिहिले आहेत’, ते पाहिलेस का ? ग्रंथांचे मूल्य योग्यच आहे. ग्रंथात अमूल्य माहिती आहे. मला एकाच डोळ्याने दिसते, तरीही मी एकेक ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करतो. हे ग्रंथ वाचून झाले की, मी आणखी ग्रंथांची मागणी देईन.’’
२. बांधकाम व्यावसायिक श्री. हरेश उतेकर यांनी स्वतःसाठी आणि इतरांना भेटदेण्यासाठी ग्रंथ अन् सनातन पंचांग घेणे
साधकांनी कोथरूड येथील बांधकाम व्यावसायिक श्री. हरेश उतेकर यांना संपर्क केला. त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘तुमचे कार्य अतिशय चांगले आहे. धर्मशिक्षणाची माहिती समाजापर्यंत पोचायलाच हवी.’’ त्यांनी ग्रंथ आणि सनातन पंचांग स्वतःसाठी अन् इतरांना भेट देण्यासाठी घेतले.
३. वाचक आणि विज्ञापनदाते श्री. अभिजीत लोढा यांनी विविध विषयांवरील ग्रंथ घेणे
वाचक आणि विज्ञापनदाते श्री. अभिजित लोढा हे नियमितपणे सनातनचे नवीन ग्रंथ घेतात. साधकांनी त्यांना संपर्क करून सनातनच्या ग्रंथांची ग्रंथसूची पाठवली होती. तेव्हा ते साधकांच्या घरी आले आणि त्यांनी इतरांना भेट देण्यासाठी बालसंस्काराविषयीचे ग्रंथ घेतले. त्यांनी आयुर्वेद, आपत्काळ आणि साधना यांविषयीचे ग्रंथही घेतले. ‘आणखी ग्रंथ लागले, तर घेतो’, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
४. बिंदूदाबनाने कंबरदुखीचा त्रास न्यून झाल्याने जिज्ञासू सौ. जया गव्हाणे यांनी ‘नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार’ हा ग्रंथ घेणे
गावठाण येथील जिज्ञासू सौ. जया गव्हाणे यांना कंबरदुखीचा त्रास होत होता. साधकांनी त्यांना ‘नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार’ या ग्रंथातील माहिती असलेले बिंदू सांगितले आणि साधिकेने त्यांचे बिंदूदाबन केले. त्या वेळी सौ. गव्हाणे यांना बरे वाटले. त्यांनी तो ग्रंथ लगेच घेतला.
५. सध्याच्या परिस्थितीत सनातनच्या ‘नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार’ आणि ‘विकारांनुसार नामजप आणि उपाय’ या ग्रंथांची मागणी समाजातून मिळत आहे.
६. जिज्ञासू सौ. दीपाली गायकवाड यांनी संक्रांतीनिमित्त वाण देण्यासाठी सनातनचे ग्रंथ घेणे
साधकांनी जिज्ञासू सौ. दीपाली गायकवाड यांना संपर्क करून संक्रांतीनिमित्त सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगितले. तेव्हा त्यांनी वाण देण्यासाठी सनातनचे ग्रंथ घेतले. ‘प्लास्टिकच्या वस्तू वाण म्हणून देण्यापेक्षा सात्त्विक ग्रंथ वाण देणे फार चांगले !’, असे त्या म्हणाल्या.
७. साधना सत्संगाला उपस्थित रहाणार्या सौ. सुनीता सुक्रे यांनी हळदीकुंकवाच्या निमित्ताने शेजार्यांना बोलावून त्यांना साधनेचे महत्त्व सांगणे आणि वाण म्हणून ग्रंथ देणे
साधकांनी कोथरूड येथील ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाला उपस्थित रहाणार्या सौ. सुनीता सुक्रे यांना संपर्क करून त्यांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’विषयी सांगितले. त्या वेळी त्यांनी वाण देण्यासाठी त्वरित ग्रंथ घेतले. त्या काही वर्षांपासून मकरसंक्रांतीला हळदीकुंकू करत नाहीत. ‘हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी सेवा होईल’, या विचाराने त्यांनी महिलांना हळदीकुंकवाला बोलावून त्यांना ‘नामजप आणि साधना’ यांचे महत्त्व सांगितले अन् वाण म्हणून ग्रंथ दिले.
८. सौ. शालन लोहकरे यांनी त्यांच्या आईच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘धर्मशिक्षण फलक’ हे ग्रंथ भेट म्हणून देणे
सिंहगड रस्ता येथील ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या वाचिका सौ. शालन लोहकरे यांच्या आईचा ७५ वा वाढदिवस होता. ‘आईला साडी किंवा मायेतील तत्सम गोष्टी देण्याऐवजी मी तिला ‘धर्मशिक्षण फलक’ हा ग्रंथ देऊ का ?’, असे त्यांनी स्वतःहून साधकांना विचारले आणि त्यांनी ग्रंथांची मागणी दिली. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘आईला ग्रंथ भेट दिल्यावर ती ते ग्रंथ माझ्या अन्य भावंडांना भेट दिल्याने ग्रंथातील अमूल्य माहिती घराघरांत पोचेल आणि त्यांना साधनेचे महत्त्व कळेल.’’
९. जिज्ञासू डॉ. श्रीकृष्ण चिंचणीकर यांनी त्यांच्या चिकित्सालयातील कर्मचार्यांना भेट म्हणून ग्रंथ देणे
सिंहगड रस्ता येथील जिज्ञासू डॉ. श्रीकृष्ण चिंचणीकर यांनी त्यांच्या चिकित्सालयातील कर्मचार्यांसाठी ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र’, ‘प्रार्थना (महत्त्व आणि उदाहरणे)’, ‘नामजप का आणि कोणता करावा ?’, ‘सात्त्विक रांगोळ्या’ आणि ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’, हे ग्रंथ घेतले. ते म्हणाले, ‘‘मी कर्मचार्यांना नियमितपणे काहीतरी भेटवस्तू देत असतो. या वर्षी हे ग्रंथ भेट देईन. ते वाचून कर्मचार्यांकडूनही देवाला प्रार्थना होतील. स्तोत्र म्हटल्याने आणि योग्य नामजप केल्याने त्यांची साधना होईल.’’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.१.२०२२)