कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा आहे ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

हिंदुबहुल भारतात खुलेआम चालणारे धर्मांतर, हे धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता दर्शवते !

मुंबई – तमिळनाडू राज्यातील ‘लावण्या’ नावाची एका शेतकर्‍याची हुशार मुलगी ख्रिस्ती संचलित शाळेत शिकत होती. तिच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली. ख्रिस्त्यांकडून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत धर्मांतर करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केला जातो. कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदु संस्कृती पाळण्यास विरोध केला जात असून सर्व ख्रिस्ती संचलित शाळा धर्मांतराची केंद्रे बनत आहेत. याला राजकीय पाठिंबाही मिळत आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु मक्कल कत्छी’चे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बलपूर्वक धर्मांतर : चर्चचे षड्यंत्र !’ या विषयावर २९ जानेवारी २०२२ या दिवशी आयोजित केलेल्या ‘विशेष संवादा’त बोलत होते. या वेळी ‘दी पायोनियर’ या इंग्रजी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार चेल्लप्पन यांनीही या संवादामध्ये सहभाग घेतला.

श्री. अर्जुन संपथ

तमिळनाडूमध्ये ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करा ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते. याचा प्रभाव येथील प्रशासनावर आहे. कर्नाटकमध्ये ‘धर्मांतरविरोधी कायदा’ पारित झाला आहे. तमिळनाडूमध्येही असा कायदा करण्याची मागणी आम्ही केली आहे.

‘कॉन्व्हेंट शाळा सर्वांत चांगल्या’,अशी चुकीची मानसिकता बनवण्यात आली आहे ! – कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘दी पायोनियर’

१. केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये बालकांवर अत्याचाराच्या पुष्कळ घटना घडतात. यामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान आरोपी असेल, तर अशा आरोपींना येथील प्रसिद्धीमाध्यमे पाठिशी घालतात. आता गावेच्या गावे धर्मांतरित केली जात आहेत. ‘कॉन्व्हेंट शाळा सर्वांत चांगल्या’ अशी चुकीची मानसिकता बनवण्यात आली आहे; मात्र आपण हिंदूंसाठी विद्यालये चालू करून आपल्या धर्मात असलेले अमूल्य ज्ञान मुलांना देऊ शकतो. त्यांना चांगले अभियंता, डॉक्टर बनवू शकतो.

__________________________________

हे पण पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “जबरन धर्मांतर : चर्च का षडयंत्र ! Forcible Conversions : A Church Conspiracy”
#ConversionByChurch

__________________

२. ‘लावण्या’ आत्महत्या प्रकरणाची नोंद येथील कुठल्याच प्रसिद्धीमाध्यमांकडून घेण्यात आलेली नाही. येथील मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये साम्यवादी, ख्रिस्ती आणि मुसलमान धार्जिणे लोक आहेत. त्यामुळे ते धर्मांतरासारख्या वृत्तांना प्रसिद्धी देत नाहीत. ख्रिस्ती आणि मुसलमान कट्टरतावाद्यांच्या वक्तव्यांना येथील प्रसारमाध्यमे लगेच प्रसिद्धी देतात.

हे ही पहा –
How Convent Schools Are Converting Hindu Children To Christianity And What Are The Ways To Tackle It.