१. अधिवक्ता विजय लक्ष्मण जमदग्नी, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र.
‘धर्मरक्षण आणि धर्मसंस्कार यांविषयी होत असलेले हे कार्य वाखाणण्यासारखे आहे. सेवाभावातून होत असलेले कार्य नेहमीच प्रेरणादायी असल्याचे दिसून आले आहे.’
२. अधिवक्ता सुमीत तोष्णीवाल, हदगाव, नांदेड, महाराष्ट्र.
‘रामनाथी येथील आश्रम पहातांना करतांना पुष्कळ छान वाटले आणि मन प्रसन्न झाले. आश्रमाची पवित्रता अनुभवता आली, तसेच येथे असलेली चांगली ऊर्जा आणि चैतन्य यांची अनुभूती आली.’
३. अधिवक्ता प्रीतेशकुमार जैन, शहाजा, जिल्हा नंदुरबार.
‘रामनाथी आश्रम छान आहे. पैशाला महत्त्व असलेल्या या युगात ‘सर्व साधक तन-मनाने सेवा करतात’, हे आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.’ (वर्ष २०१९)