पाकच्या राष्ट्रीय बँकेला अमेरिकेकडून ४१४ कोटी रुपयांचा दंड

आर्थिक अपव्यवहारच्या विरोधातील नियमांचे उल्लंघन केल्याचा परिणाम

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आर्थिक अपव्यवहाराच्या विरोधातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ‘अमेरिका फेडरल रिझर्व्ह’ आणि ‘न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनेंशियल सर्व्हिसेस’ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल बँकेच्या न्यूयॉर्क येथील शाखेला ४१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.