बारामती (पुणे) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे ५२५ कोटी रुपयांचे वीजदेयक थकवले आहे. त्यातील २०७ कोटी रुपये व्याज आहे. या व्याजाला सवलत देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे; पण मूळ देयक ३१८ कोटी रुपये भरावेच लागतील. ‘ब्रह्मदेव आला तरी वीजदेयके माफ केली जाणार नाहीत. देयके भरावीच लागतील’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीने नवीन पथदिव्यांकरिता पवार यांना निवेदन दिले होते. त्या वेळी ते बोलत होते.