गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), २३ फेब्रुवारी (वार्ता.) – शेतातील कामे करतांना ती सेवा म्हणून करणार्या, ‘गायीची सेवा करतांना गोमातेचीच सेवा करते’, या भावाने सेवा करणार्या, तसेच भाव, भक्ती आणि गुरुदेवांवरील श्रद्धा यांच्या जोरावर श्रीमती शांता बाबूराव शिंदे (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ही आनंदवार्ता सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी १७ फेब्रुवारी या दिवशी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. संगीता कडूकर (श्रीमती शांता बाबूराव शिंदे यांची मुलगी) यांच्या घरी झालेल्या सत्संग सोहळ्यात घोषित केली. यानंतर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीकृष्णाचे चित्र आणि प्रसाद देऊन श्रीमती शांता बाबूराव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांची मुलगी सौ. संगीता कडूकर यांसह अन्य साधक उपस्थित होते.
श्रीमती शांता शिंदे यांची विहिण श्रीमती सुशिला कडूकर (वय ७८ वर्षे) यांचीही आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे.
श्रीमती शांता शिंदे यांच्यात गुरुदेवांप्रती आणि साधकांप्रती पुष्कळ भाव आहे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये
श्रीमती शांता शिंदे यांचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या १२ वर्षांपासून त्या एकट्याच शेतात रहात आहेत. गुरुदेवांवर त्यांची दृढ श्रद्धा आहे. त्या शेतात एकट्याच भोजन बनवणे, गायींची सेवा करणे यांसह अन्य कामे करतात. त्यांच्यात गुरुदेवांप्रती, साधकांप्रती पुष्कळ भाव आहे, त्यामुळे त्यांची जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका झाली, असे सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी या वेळी सांगितले.
गुरुदेवांनीच माझी जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका केली ! – श्रीमती शांता बाबूराव शिंदे
मनोगत व्यक्त करतांना श्रीमती शांता शिंदे म्हणाल्या, ‘‘शेतात मी एकटी असतांना रात्री वाईट शक्तींचे आवाज येतात; परंतु त्या द्वारातून आत येऊ शकत नाहीत; कारण गुरुदेवांचे संरक्षण कवच आमच्या घराभोवती निर्माण झाले आहे. घरात परात्पर गुरु डॉ. आठवले याचे छायाचित्र आहे. त्यामुळे मला पुष्कळ मोठा आधार वाटतो. त्यामुळेच मी अनेक संकटातून बाहेर पडले आहे. जे काही आहे ते गुरुदेवांचेच आहे. गुरुदेवांनीच माझी जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका केली याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते.’’
शेतात एकटी रहात असूनही आईने भावाच्या स्तरावर प्रयत्न केले ! – सौ. संगीता कडूकर (श्रीमती शांता बाबूराव शिंदे यांची मुलगी)
पूर्वी आई प्रसारात सेवा करायची. सध्या तिला गुडघ्याच्या त्रासामुळे प्रसारात जाऊन सेवा करणे शक्य होत नाही; मात्र सनातन संस्थेच्या वतीने सांगितले जाणारे सगळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय, नामजप ती श्रद्धेने करते. ती सतत गुरुदेवांची आठवण काढते. गुरुदेवांनी तिला जन्म-मृत्यू यांच्या फेर्यांतून मुक्त करावे अशी तिची पुष्कळ इच्छा होती. ती लिंगनूर येथे शेतात काम करतांना सर्वकाही सेवा म्हणून करत आहे, असा भाव ठेवते. शेत आणि घर येथील कामे करतांना ती सतत नामजप करते. मी तिला कधी भ्रमणभाष केल्यास ती मला साधनेविषयीच विचारते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धाअ. तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर फार श्रद्धा आणि भक्ती आहे. तिने शेतातील घरात प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र लावले आहे. ती मला सांगते, ‘‘तेच माझे रक्षणकर्ते आहेत. गुरुदेव मला ज्या स्थितीत ठेवतील, त्या स्थितीत मी आनंदाने राहीन.’’ तिला कधी कधी रात्री सुगंध येतो. तेव्हा ‘दाराबाहेर काठी घेऊन कुणीतरी रक्षणासाठी आहे’, असे तिला जाणवते. आ. ती प्रतिदिन प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राची पूजा करते. आता ते छायाचित्र गुलाबी झाले आहे. त्या छायाचित्राकडे पाहून पुष्कळ आनंद जाणवतो. – सौ. संगीता कडूकर |
श्रीमती शांता शिंदे यांची गुणवैशिष्ट्ये
१. परिस्थिती स्वीकारणे
१ अ. वडिलांच्या निधनानंतर आईने स्थिर राहून मुलीला साधनेकडे लक्ष देण्यास सांगणे : ‘माझ्या वडिलांचे त्यांच्या वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर आईवर घराचे दायित्व आले. मी वडील गेल्यानंतर फार दुःखी झाले होते. तेव्हा आईनेच मला धीर दिला. ती मला म्हणाली, ‘‘तू सत्संगात जात जा. तिथे तुझे मन रमेल. त्यांची (वडिलांची) आपल्याला तेवढीच साथ होती. आता तू ‘तुझे कुटुंब आणि साधना’ यांकडे लक्ष दे. माझी काळजी करू नकोस.’’ २ – ३ वर्षांनी तीही सत्संगाला जाऊ लागली.
१ आ. शेतात आनंदाने एकटीने रहाणे : आमच्या घरी एक गाय आहे. आईलाच तिची देखभाल करावी लागते. आईने ती परिस्थिती आनंदाने स्वीकारली आहे. शेतात रहाणे सोयीचे होते; म्हणून ती एकटीच तिथे रहाते. शेतात शेजारी कुणी नाही. सर्व बाजूंनी ऊस आहे. ती रात्री घरी एकटीच असते; पण तिला भीती वाटत नाही.
२. साधनेची तळमळ
अ. आई गेल्या २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. त्या वेळी ती प्रत्येक आठवड्याला लिंगनूरहून ३ कि.मी. अंतर चालून गडहिंग्लज येथे सत्संगाला येत असे. कितीही ऊन अथवा पाऊस असला, तरीही ती सत्संग चुकवत नसे. सत्संगात सांगितलेल्या सूत्रांनुसार ती श्रद्धेने आचरण करत असे. गेल्या १० वर्षांपासून तिचा गुडघ्याचा त्रास वाढला आहे. त्यामुळे ती आता सत्संगाला जाऊ शकत नाही.
आ. मी तिला कधी भ्रमणभाष केल्यास ती मला साधनेविषयीच विचारते. तिला सांगितल्याप्रमाणे ती नामजपादी उपाय करते.
इ. शेत आणि घर येथील कामे करतांना ती सतत नामजप करते.
३. सेवेची तळमळ
हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळी ती प्रतिदिन आमच्या समवेत प्रसाराला येत असे. हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळी स्वयंपाक करण्यासाठी ती ८ दिवस सेवेच्या ठिकाणी रहात असे. ती पहाटे उठून नामजप करून वेळेत सेवेसाठी जात असे. ती पुष्कळ उत्साहाने आणि तळमळीने सेवा करत असे. हिंदु राष्ट्र-जागृती सभा असल्यास ती कामाचे नियोजन करून शेतीची कामे आधीच पूर्ण करून सेवेला यायची.
४. श्री रेणुकादेवीप्रती श्रद्धा
आईची पूर्वीपासूनच श्री रेणुकादेवीवर पुष्कळ श्रद्धा आहे. रेणुकादेवीची पूजा करतांना तिला शारीरिक त्रास झाले, तरीही तिला पूजा करतांना आनंदच वाटायचा. ‘रेणुकादेवीच्या कृपेने घरात सर्वकाही चांगले होते’, असे म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करत असे.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा
अ. तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर फार श्रद्धा आणि भक्ती आहे. तिने शेतातील घरात प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र लावले आहे. ती मला सांगते, ‘‘तेच माझे रक्षणकर्ते आहेत. गुरुदेव मला ज्या स्थितीत ठेवतील, त्या स्थितीत मी आनंदाने राहीन.’’ तिला कधी कधी रात्री सुगंध येतो. तेव्हा ‘दाराबाहेर काठी घेऊन कुणीतरी रक्षणासाठी आहे’, असे तिला जाणवते.
आ. ती प्रतिदिन प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राची पूजा करते. आता ते छायाचित्र गुलाबी झाले आहे. त्या छायाचित्राकडे पाहून पुष्कळ आनंद जाणवतो.
६. कृतज्ञताभाव
अ. ‘मी प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जवळ आहे. तेच माझे रक्षण करतात. ते मला सर्व शारीरिक त्रासांतही आनंदी ठेवतात’, असे म्हणून ती सतत कृतज्ञता व्यक्त करते.
आ. माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाल्यानंतर ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली’, असे वाटून तिच्या डोळ्यांत भावाश्रू आले.
७. आईमध्ये जाणवलेले पालट
आरंभी आईला कुटुंबियांकडून अपेक्षा असल्यामुळे तिची चिडचिड होत असे. ‘आता स्वतःला पालटायचे आहे’, असे ठरवून तिने स्वतःतील स्वभावदोष आणि अहंचे पैलू लक्षात घेऊन कृतीच्या स्तरावर पालट केले आहेत. आता ती एकदम शांत असते. आता ती सर्व परिस्थिती आनंदाने स्वीकारून अधिकाधिक नामजप करण्याकडे लक्ष देते.
देवाच्या कृपेनेच आईत हे पालट झाले आणि तिचा कृतज्ञताभावही वाढला. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. संगीता कडूकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), गडहिंग्लज, कोल्हापूर. (३.११.२०२१)