बेंगळुरू (कर्नाटक) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार, बी.के. हरिप्रसाद आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात आहे, असा आरोप भाजपचे आमदार एम्.पी. रेणुकाचार्य यांनी केला आहे. ‘माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवावे’, अशी मागणीही रेणुकाचार्य यांनी केली आहे. आमदार रेणुकाचार्य यांनी हर्ष यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांंचे आर्थिक साहाय्य घोषित केले आहे.
Congress is behind the murder of Harsha. He was killed because of DK Shivakumar, BK Hariprasad & other Congress leaders. I urge Home minister to hand over the case to NIA. I will give the compensation of Rs 5 lakh to the family: MP Renukacharya, BJP MLA from Honnali, Karnataka pic.twitter.com/VCaBmNgtYg
— ANI (@ANI) February 22, 2022