हिजाब आणि बुरखा हवा असेल, तर मदरशांत जावे ! – आमदार टी. राजा सिंह

भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

उज्जैन (मध्यप्रदेश) – जर बुरखा आणि हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) इतकेच आवश्यक आहे, तर त्यांनी स्वतःसाठी वेगळ्या शाळा आणि महाविद्यालये बांधावित किंवा मदरशांमध्ये जावे. डॉक्टर, अभियंते बनायचे असेल, तर ते मदरशांत शिकून बनता येणार नाही. शाळा आणि महाविद्यालये येथे जाण्यासाठी  हिजाबचा हट्ट धरलात, तर भिकारी आहात आणि भिकारीच रहाल, असे विधान भाग्यनगर (तेलंगणा) येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. ते येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या महाकालेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी आले होते.