बोरनडी (सोजत रोड, राजस्थान) – येथील पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये गोग्रास सेवा समितीला ‘ई-ऑटो रिक्शा’ (विद्युत् बॅटरीवर चालणारी रिक्शा) भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी गोग्रास सेवा समितीच्या वतीने ‘ई-ऑटो रिक्शा’ भेट देणारे श्री. जगदीश बंजारा, श्री. ईश्वर बंजारा, श्री. मनोज सोनी आणि अन्य ८ जणांचा सत्कार करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा यांनाही ‘गोस्मृती’ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनच्या राष्ट्र-धर्मविषयक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
मी गेल्या १५-२० वर्षांपासून पहात आहे. समाजाला जेव्हा प्रबोधनाची आवश्यकता असते, तेव्हा हिंदु जनजागृती समिती पुढे येऊन अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करते. राष्ट्र आणि धर्म यांसाठी निरपेक्ष कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता आहे.
‘गोग्रास सेवा समिती’ आणि ‘हरियालो राजस्थान’ यांनी हिंदु जनजागृती समितीविषयी काढलेले कौतुकोद्गार
गोग्रास सेवा समितीचे अध्यक्ष श्री. पियुष त्रिवेदी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृतीच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले की, भावी पिढीला हिंदु संस्कृतीचे संस्कार देण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये निराशा निर्माण झाली आहे. हिंदु जनजागृती समिती युवा पिढीमध्ये जागृती करण्याचे चांगले कार्य करत आहे.
|