मिरज, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – कृष्णा घाट येथे १३ फेब्रुवारीला कृष्णा-वेणी उत्सव सोहळा आणि कृष्णा नदीची महाआरती सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. तत्पूर्वी १२ फेब्रुवारी या दिवशी नदीची स्वच्छता करण्यात आली. १३ फेब्रुवारी या दिवशी श्री अंबाबाई मंदिर येथून श्री दत्त मंदिर, कृष्णा घाट, श्री मार्कंडेश्वर मंदिर अशी पालखी काढण्यात आली. भाविकांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले. यानंतर प्राणप्रतिष्ठापना, पंचोपचार पूजा, अभिषेक असे कार्यक्रम झाले. दुपारी ४ वाजता भजन, सायंकाळी ५ वाजता सौ. शुभदा पाटकर, कल्याणी पटवर्धन, मुक्ता पटवर्धन यांनी विविध कार्यक्रम सादर केले.
सायंकाळी आमिषा करंबेळकर आणि त्यांच्या शिष्या यांचा कथ्थक नृत्याविष्कार झाला. रात्री ७ वाजता कृष्णामाईची महाआरती करण्यात आली. या वेळी भाजप आमदार श्री. सुरेश खाडे, श्री. गोपाळ राजे पटवर्धन, सौ. पद्माराजे पटवर्धन,
श्री. किशोर पटवर्धन, सौ. इरावती पटवर्धन, श्री. माधवराव गाडगीळ, श्री. मोहन वनखंडे, नगरसेविका सौ. अनिता वनखंडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. समितीचे निमंत्रक श्री. ओंकार शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.