‘ईश्वराकडे १४ विद्या आणि ६४ कला आहेत. भक्त यांपैकी एखाद्या मार्गाने साधना करून ईश्वरप्राप्ती करतो. याप्रमाणे सनातनमध्ये भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग इत्यादी अनेक योगमार्ग (विविध विद्या), तसेच संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तीकला इत्यादी कला ‘साधना’ म्हणून शिकवल्या जातात. सनातनमध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग ’, या सिद्धांतानुसार साधकाला आवश्यक त्या मार्गाची शिकवण दिली जाते. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांची साधनेत जलद प्रगती होत आहे. (१०.२.२०२२ पर्यंत सनातनचे ११९ साधक संत झाले आहेत आणि अनेक साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत.)
याउलट बहुतेक संप्रदायांमध्ये त्यांच्या गुरूंना ज्ञात असलेला एकच साधनामार्ग शिकवला जातो. त्यामुळे विविध संप्रदायांमधील भक्तांची विशेष आध्यात्मिक प्रगती होत नाही. त्यांना बहुदा एकच उत्तराधिकारी असतो किंवा नसतोही ! ’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०२१)