युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची शक्यता
नवी देहली – युक्रेन आणि रशिया यांच्यात कधीही युद्धाचा भडका उडू शकतो. अशी स्थिती असतांना युक्रेनमधील भारतीय दूतावासाने खबरदारीचा उपाय म्हणून युक्रेनमधील भारतीय नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेन देश तात्पुरता का होईना सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Indian Embassy in #Ukraine has asked its citizens to leave Kyiv temporarily amid the ongoing tension between Russia and Ukraine.#UkraineCrisis https://t.co/mHpSyMHylu
— The New Indian Express (@NewIndianXpress) February 15, 2022
दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘अत्यावश्यक असेल, तरच युक्रेनमध्ये रहा. जे युक्रेनमध्ये रहाणार आहेत त्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा. त्यांनी त्यांच्या वास्तव्याविषयीची माहिती दूतावासाला कळवावी.’ भारतीय दूतावास नेहमीप्रमाणे काम चालू ठेवणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. अमेरिकेने यापूर्वीच त्याच्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे.