गोव्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने
१. नोकरीमध्ये ८० टक्के आरक्षण देणार
२. सत्तेत आल्यावर पुढील ५ वर्षांत २ लाख नोकर्या निर्माण करणार
३. प्रत्येक घरातील एका महिलेला प्रतिमास ५ सहस्र रुपये देणार
४. बेघर कुटुंबियांना ५० सहस्र अनुदानित घरे देणार
५. प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक मासाला ३०० युनिट विनामूल्य वीज देणार
६. शेतकर्यांना विनामूल्य वीज, तर प्रत्येकाला २४ घंटे वीज देणार
७. घरातील एका महिलेला प्रतिमास २ सहस्र ५०० रुपये देणार
८. सर्वधर्मियांसाठी विनामूल्य तीर्थयात्रा आयोजित करणार
९. बेरोजगार तरुणांना प्रतिमास ३ सहस्र रुपये देणार
१०. महिलांना वर्षाकाठी ३ गॅस सिलिंडर विनामूल्य देणार
११. ज्येष्ठ नागरिकांचे योजनेचे मानधन वाढवून ते प्रतिमास ३ सहस्र रुपये करणार
१२. युवकांना नोकर्या देणार्या उद्योजकांना कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी ५ सहस्र रुपये देणार
१३. महिलांसाठी २ टक्के आणि पुरुषांसाठी ४ टक्के व्याजदराने गृहकर्ज देणार
१४. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमास ३ सहस्र रुपये देणार
१५. गरीब व्यक्तीला प्रतिमास ६ सहस्र रुपये देणार
१६. बंद असलेला खाण उद्योग पुन्हा चालू करणार
१७. पेट्रोल आणि डिझेल यांचे दर ८० रुपयांपर्यंत ठेवणार
१८. महिलांना सरकारी नोकर्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देणार
१९. राज्य अल्पसंख्यांक आयोग स्थापन करणार