अशी धमकी देऊन कायदा हातात घेण्याची भाषा करणार्यांना तात्काळ अटक करून कारागृहात टाकणे आवश्यक !
अलीगड (उत्तरप्रदेश) – भारत हा विविधता असलेला देश आहे. कपाळी टिळक असो कि पगडी, बुरखा असो कि हिजाब, हे सर्व आपल्या संस्कृती आणि परंपरा यांचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्यावर राजकारण करून वाद निर्माण करणे, म्हणजे नीचतेची परिसीमा आहे. महिलांना कमकुवत समजण्याची चूक करू नका. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. बहिणी-मुलींच्या स्वाभिमानाला हात घातलात, तर झाशीची राणी आणि रजिया सुलतान बनून त्यांचे हात कापून टाकू, असे विधान समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि येथील शहर अध्यक्षा रुबिना खानुम यांनी कर्नाटकच्या हिजाब प्रकरणी केले आहे.