हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रबोधनपर व्याख्यानाचा परिणाम !
‘जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चे अभिनंदन ! याचा आदर्श सर्वत्रच्या व्यापार्यांनी घेतल्यास हलाल अर्थव्यवस्थेवर आळा बसेल !
यवतमाळ, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – हलाल प्रमाणपत्राचे धोके लक्षात घेता हलालप्रमाणित सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार येथील ‘जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. पंकज नानवाणी यांच्यासह उपस्थित ३५ पदाधिकार्यांनी व्यक्त केला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी नुकतेच ‘जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणार्या हलाल प्रमाणपत्राच्या संदर्भात प्रबोधन केले. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
या वेळी श्री. सुनील घनवट म्हणाले की,
१. हलाल अर्थव्यवस्था ही देशाच्या सुरक्षेशी खेळणारी अर्थव्यवस्था आहे. या व्यवस्थेमुळे भारतीय बाजारपेठ आणि व्यापारी यांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, तसेच व्यापार अन् भारतीय अर्थव्यवस्था यांमध्ये हस्तक्षेप करून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. त्यामुळे शासनाने हलाल प्रमाणपत्राला भारतामध्ये बंदी आणावी.
२. या वेळी श्री. घनवट यांनी ‘हलाल’ म्हणजे काय ? ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे काय ? त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय दुष्परिणाम होणार आहे ? विविध क्षेत्रांत ही यंत्रणा कशी कार्यरत आहे ? हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा देश-विदेशांत आतंकवादी कारवायांसाठी कसा वापरला जातो आदी सूत्रांवर प्रबोधन केले.
‘हलाल’ प्रमाणपत्र म्हणजे काय ?
इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरता मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र, थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल’ प्रमाणपत्र म्हटले जाते. देशात समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभारून प्रचलित अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी धर्मांधांनी ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या माध्यमातून रचलेला हा कट आहे.