(म्हणे) ‘मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुंडांचा मी निषेध करतो !’

गीतकार जावेद अख्तर यांचे हिंदुद्वेषी ट्वीट

जावेद अख्तर

मुंबई – मी हिजाबच्या बाजूने कधीही नव्हतो, आताही माझे तसेच आहे; पण मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुंडांचा मी निषेध करतो. हीच त्यांची मर्दानगी आहे का ?, असे ट्वीट हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. (अख्तर जर हिजाबच्या बाजूने नाहीत, तर ‘हिजाब घालू नका’, असे त्यांच्या धर्मभगिनींना स्पष्ट सांगण्याचे धैर्य त्यांच्यात का नाही ? यातून केवळ हिंदुविरोधासाठी त्यांना ट्वीट करायचे आहे, हेच लक्षात येते ! – संपादक) कर्नाटकातील महाविद्यालयात हिंदु मुले आंदोलन करतांना समोरून आलेल्या बुरखाधारी मुलीने ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा दिल्या. या घटनेवर अख्तर यांनी वरील ट्वीट केले आहे.

(म्हणे) ‘एकट्या विद्यार्थिनीवर आक्रमण करणे, हे लज्जास्पद आहे !’ अभिनेत्री रिचा चढ्ढा यांचे प्रक्षोभक ट्वीट

रिचा चढ्ढा

घाबरणार्‍यांचा एक झुंड एकट्या विद्यार्थिनीवर आक्रमण करणे अभिमास्पद समजतो, हे लज्जास्पद आहे. येणार्‍या काळात हे सर्व बेरोजगार, निराश आणि दरिद्री होतील. यांना कोणतीही सहानुभूती नाही आणि मुक्ती नाही. अशा घटनांवर मी थुंकते, अशा अश्लाघ्य शब्दांत अभिनेत्री रिचा चढ्ढा ट्वीट केले आहे. (व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थिनीवर कुठलेही आक्रमण केलेले दिसत नसतांना अशा प्रकारे खोटे पसरवणे, हे एक मोठे षड्यंत्रच असल्याचे समोर येत आहे ! कारण या व्हिडिओनंतर अशा प्रकारे ट्वीट करणे, ठिकठिकाणी मोर्चे काढणे असे सुनियोजित कार्यक्रम सगळीकडे चालू झाले ! – संपादक) कर्नाटकातील वरील घटनेच्या संदर्भात चढ्ढा यांनी हे वरील ट्वीट केले आहे.

सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत ‘कर्नाटकमधील ‘त्या’ व्हिडिओतील काही अतार्किक गोष्टी !

१. ज्या व्हिडिओच्या संदर्भावरून हे दोन्ही ट्वीट करण्यात आले आहेत, तो व्हिडिओ मुद्दामहून चित्रीत केल्याचे स्पष्टपणे लक्षात येत आहे. ‘लांबून ती मुलगी स्कूटरवरून उतरत आणि दुचाकी लावून पुढे चालत येते’, असे या व्हिडिओत दिसते. ‘जणू ती मुलगी आल्यावर संबंधित प्रसंग घडणार आहे’, हे माहीत असल्याप्रमाणे हे चित्रीकरण केले असल्याचे निदर्शनास येते. हा प्रसंग घडतांना व्हिडिओ काढला, तर त्यात असे येऊ शकत नाही. यासह महाविद्यालयात गाडीवरून येणार्‍या या मुलीच्या पायात चपलाही नाहीत, हेही आश्चर्यकारक आहे.

२. जावेद अख्तर आणि रिचा चढ्ढा हे ज्यांचा ‘गुंड’ म्हणून उल्लेख करत आहेत, त्या हिंदु विद्यार्थ्यांच्या गटाने तिला घाबरवलेलेही नाही कि तिला घेरलेलेही नाही. ते त्यांचे आंदोलन करत असतांना ती त्यांच्यासमोरून जात अचानक ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देणे चालू करते, असे यात व्हिडिओत दिसत आहे.

३. बुरखा घालून आलेल्या त्या मुलीची इतर सर्वत्र विनाबुरख्याची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहेत.

४. जिग्नेश मेवाणी, पत्रकार तिस्ता सेटलवाड आणि कन्हैयाकुमार या हिंदुविरोधी लोकांसमवेत तिचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले असल्याचे सांगितले जात आहे, यावरून हे सुनियोजित षड्यंत्र असल्याचे लक्षात येते, अशीही चर्चा सामाजिक माध्यमांवर आहे.