‘भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे इराणमध्ये महंमद जवाद या २६ वर्षांच्या मुष्टीयुद्धपटूला (‘बॉक्सर’ला) फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेल्या शांततापूर्ण विरोधासाठी त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कुस्तीपटू नवीद अफकारी याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ‘द सन’ दैनिकाच्या वृत्तानुसार इराणमध्ये प्रतिवर्षी जवळपास २५० जणांना फासावर चढवले जाते. इराणमध्ये ‘क्रेन’ला लटकवूनही अत्यंत क्रौर्यतेने फाशी दिली जाते, तसेच दोषीवर चाबकाच्या फटक्यांचा वर्षावही केला जातो.’