उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. यश पालशेतकर हा या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
श्री. सुदेश धोंडू पालशेतकर (वडील), पोलादपूर, जिल्हा रायगड.
१. देवाची ओढ असणे
‘यश १ वर्षाचा असतांना मी त्याला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात घेऊन गेलो होतो. तेथे ध्यानमंदिरात गेल्यावर तो रांगत रांगत देवतांच्या चित्रांसमोर गेला आणि त्याने डोके टेकवून नमस्कार केला. यशने स्वतःहून ही कृती केली होती. आमच्या घरातील वातावरण आध्यात्मिक असल्यामुळे त्याला लहानपणापासूनच देवाविषयी आवड निर्माण झाली आहे. तो प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ गणपतिस्तोत्र म्हणतो, तसेच नामजप करतो.
२. यश शांत स्वभावाचा आहे. शाळेमध्ये तो सर्वांशी जुळवून घेतो.
३. काटकसरीपणा
एकदा यश अंघोळीसाठी गेला असता तेथे साबणाचा लहान तुकडा शिल्लक राहिल्याने त्याच्या आईने त्याला नवीन साबण वापरायला दिला. तेव्हा यश लगेच म्हणाला, ‘‘आई, थोडा साबण असतांना तू नवीन साबण वापरायला काढला आहेस. असे परात्पर गुरु डॉक्टरांना आवडत नाही.’’ यश त्याच्या आईला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन काटकसरीपणाने वागायला सांगतो.
४. सेवेची तळमळ
४ अ. विविध सेवा मनापासून करणे : मला सकाळी लवकर कामावर जावे लागले, तर तो बसस्थानकावर जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा घेऊन येतो आणि अंकांचे वितरण करतो. पोलादपूर येथील प्रासंगिक सेवांमध्ये तो सहभागी होतो आणि मनापासून सेवा करतो. वर्ष २०१८ मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झालेल्या गुरुपौर्णिमेच्या वेळी यशला बालकक्षाचे दायित्व मिळाले होते. त्या वेळी त्याने सेवेतील सर्व बारकावे समजून घेतले आणि सेवा मनापासून केली.
४ आ. सुटीत आश्रमात जाऊन मन लावून सेवा करणे : मे मासात शाळेला सुटी लागली की, तो अन्य कुठे न जाता पनवेलला त्याच्या काकांकडे जातो. तेथे तो आजीच्या समवेत सनातनच्या देवद आश्रमात जातो आणि सात्त्विक उत्पादनांच्या सेवांमध्ये साहाय्य करतो. मे २०१९ मध्ये यश देवद आश्रमात गेला होता. तेव्हा तेथील साधकांनी दिलेली सेवा तो मन लावून करायचा. ‘सुटी संपल्यावर मी त्याला घरी घेऊन जाण्यासाठी येणार आहे’, हे कळल्यावर तो म्हणाला, ‘‘बाबा, तुम्ही मला न्यायला नंतर या. मला आश्रमात आणखी सेवा करायची आहे.’’
५. देवद आश्रमातून घरी परतल्यावर यशमध्ये झालेले पालट
अ. आश्रमातून घरी आल्यापासून यश व्यष्टी साधना अधिक गांभीर्याने करू लागला आहे.
आ. तो अन्य कोणत्याही विषयावर न बोलता केवळ आश्रमातील संत, साधक आणि त्याला शिकायला मिळालेली सूत्रे यांविषयीच बोलतो.’
श्री. संजय आणि सौ. समिधा पालशेतकर (काका आणि काकू)
१. घरातील कामांत साहाय्य करणे
‘घरात सर्वांचे भोजन किंवा अल्पाहार झाल्यावर यश ‘कापड घेऊन लादी पुसणे, भांडी स्वयंपाकघरात नेऊन ठेवणे, तसेच बाजारातून काही साहित्य आणणे’, अशा कामांत साहाय्य करतो.
२. आश्रमात गेल्यावर तेथील नियोजनानुसार यशने प्रतिदिन उत्साहाने सेवा करणे आणि संत अन् साधक यांनी त्याचे कौतुक करणे
प्रतिवर्षी मे मासाच्या सुटीत यश आमच्याकडे पनवेल येथे रहायला येतो. या वर्षी आल्यावर त्याने ‘मला देवद आश्रमात सेवेसाठी जायचे आहे’, असे सांगितले. आश्रमात त्याच्या सेवेचे नियोजन करण्यात आले. त्या नियोजनानुसार यश उत्साहाने सेवेला जायचा. सकाळी ७ वाजता उठून तो आश्रमात स्वरक्षण प्रशिक्षणवर्गालाही जायचा. त्याला घरी परतण्यास रात्रीचे ११ वाजले, तरी तो उत्साही असायचा. ‘यशला शारीरिक सेवा झेपेल का ?’, असे आम्हाला वाटायचे; परंतु तो न थकता उत्साहाने सेवा करायचा. त्याला ‘थोडी विश्रांती घे’, असे म्हटल्यावर ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा करत आहे. मला काही होणार नाही’, असे तो सांगायचा. पू. गडकरीकाका (सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी ) आणि आश्रमातील साधक यांनी ‘यशमध्ये सेवेची पुष्कळ तळमळ आहे अन् तो मन लावून सेवा करतो’, असे सांगितले.
३. चूक झाल्यावर खंत वाटणे
एकदा दुपारी आश्रमात महाप्रसाद वाढून घेत असतांना त्याच्या हातातून जेवणाचे ताट खाली पडले. नंतर घरी आल्यावर ‘माझ्या हातून देवाच्या प्रसादाचे ताट खाली पडले’, असे म्हणून तो हमसाहमशी रडू लागला. त्याने मला ‘आश्रमातील चुकांच्या फलकावर चूक कशी लिहायची ?’, हे विचारून चूक लिहिली. त्यानंतरच तो शांत झाला.’
सौ. जया नितीन साळोखे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
न थकता आणि न थांबता अखंड सेवा करणे
एकदा मी आश्रमाची स्वच्छता करत होते. तेव्हा यश माझ्या समवेत साहाय्यासाठी होता. त्याने सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत सलग सेवा केली. मला त्याचे पुष्कळ साहाय्य झाले. त्या वेळी ‘माझ्या साहाय्यासाठी समवेत एक बालसाधक नसून कुणी मोठी व्यक्तीच आहे’, असे मला वाटले. मी त्याला ‘जड साहित्य उचलू नकोस. तुला जमणार नाही’, असे सांगत होते; पण तो ती सेवाही सहज करत होता. तो शेवटपर्यंत अखंड सेवा करत होता. तेव्हा मला ‘तो दैवी बालक आहे’, असे वाटले.’
(या लेखातील सर्व सूत्रे जून २०१९ मधील आहेत.)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.