ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव यांचे निधन !

सांगलीत वर्ष २००८ मध्ये ‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी डावीकडून श्री. शरद फडके, रमेश देव, सीमा देव, तसेच अन्य

मुंबई, ३ फेब्रुवारी – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (वय ९३ वर्षे) यांचे २ फेब्रुवारी या दिवशी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा, मुलगा अभिनेता अजिंक्य देव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रमेश देव यांनी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जीवनकार्य पुढे आणण्यासाठी वर्ष २००७ मध्ये ‘वासुदेव बळवंत फडके’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. मोठ्या अडचणींना सामोरे जात त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला. त्यासाठी वर्ष २००८ मध्ये त्यांना सांगली येथे सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने ‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.