पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आणि हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर (वय ७९ वर्षे) यांचे २ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. २ दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काळभोरनगर भागातून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले. तीन वेळा ते नगरसेवक होते. बाबर यांची मोठी राजकीय कारकीर्द होती. वर्ष १९९२-९३ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले होते.