मिरज, ३० जानेवारी (वार्ता.) – भाजप, जयगोंड कोरे मित्र मंडळ आणि ‘सिनर्जी मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (अनुचित जातीजमाती मोर्चा) श्री. मोहन वनखंडेसर यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, साखर, नेत्र पडताळणी, नियमित आरोग्य पडताळणी करण्यात आली. याचा २०० जणांनी लाभ घेतला.
या प्रसंगी भाजपचे श्री. दिगंबर कोरे, नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक आनंद देवमाने, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. संगीता खोत, गजेंद्र कुल्लोली, विनायक माईणकर, रूपाली देसाई, अनघा कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते. या शिबिरास ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी यांनी भेट दिली.